लेकलँण्ड केमिकल्स कंपनीत स्थानिकांना कायमस्वरुपी कामावर घ्या - माडप आदिवासी, ठाकूरवाडीतील तरूणांची मागणी

 लेकलँण्ड केमिकल्स कंपनीत स्थानिकांना कायमस्वरुपी कामावर घ्या - माडप आदिवासी, ठाकूरवाडीतील तरूणांची मागणी



काशिनाथ जाधव : प्रतिनिधी 
पाताळगंगा : ३० एप्रिल,

             माडप ग्रामपंचायत हद्दीतील लेकलँण्ड केमिकल्स कंपनीत कामगार भरती सुरू असल्याने नोकरी मिळविण्यासाठी माडप येथील आदिवासीवाडी आणि ठाकूरवाडीतील बेरोजगार तरूण कंपनी व्यवस्थापकाकडे विनंती करीत आहेत. परंतु कंपनी व्यवस्थापक तरूणांना नोकरी देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने सर्व तरूणांनी कंपनीच्या गेटसमोर बसून व्यवस्थापनाचा मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
          माडप येथील आदिवासीवाडी आणि  ठाकूरवाडीतील बेरोजगार तरूणांनी कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देवून आमचे शिक्षण बघून कामावर घेण्यासाठी विनंती केली आहे, तरीही कंपनी व्यवस्थापक आदिवासी, ठाकूरवाडीतील तरूणांच्या मागणी दुर्लक्ष करीत असल्याने कंपनी समोर माडपचे माजी सरपंच बाळू चव्हाण, विद्यमान उपसरपंच नरेश निरगुडा, महेश शिद, विलास शिद, गोपीनाथ निरगुडा, सुरेश निरगुडा, शंकर वाघ, मंगल्या निरगुडा, संदेश शिद, सुनील वारे, रुपेश निरगुडा, गणेश पवार, मंगेश वाघ, अनंता निरगुडा, अरुण निरगुडा आदी प्रमुख ग्रामस्थ संताप व्यक्त केला आहे.


                    
         --------------चौकट -------------
      कंपनीत नवीन नोकर भरती करीत असताना स्थानिकांना कामावर घ्या आणि वर्षानंतर कायमस्वरुपी करा अशी मागणी आहे, परंतु कंपनी व्यवस्थापक कानाडोळा करीत आहे. 
 माडप माजी -  सरपंच बाळू चव्हाण 
     
         ---------------- चौकट    ----------------
         माडप ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासीवाडी, ठाकूरवाडीत सुशिक्षित बेरोजगार तरूण आहेत.त्यांना त्यांच्या शिक्षणानुसार कंपनीने काम द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन करू
       विद्यमान उपसरपंच - नरेश निरगुडा यांनी दिला आहे.


Post a Comment

0 Comments

खरीप हंगामातील उत्पन्न वाढविणांसाठी शेतकरी वर्गांची रामेती येथे कार्यशाळ