सर्वसामान्यांसाठी माहितीचा अधिकार फेडरेशन चा पुढाकार

 सर्वसामान्यांसाठी माहितीचा अधिकार फेडरेशन चा  पुढाकार 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक :  १९ फेब्रुवारी                               


             माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, यांच्या वतीने जेष्ठ नागरिक सभागृह चौक येथे आयोजित करण्यात आले.दैनंदिन जिवनात अनेक ठिकाणी आपली फसवणुक होत असुन काही ठिकाणी होत असलेला भ्रष्ट्राचार हा माहीतीच्या अधिकारीच्या माध्यातून आपण निदर्शनास आणू शकतो.मात्र त्यांची माहित आपणांस हवी या उद्दात विचारांतून या शिबीरांचे आयोजन करण्यांत आले.
              यावेळी तालुक्यातील असंख्य नागरिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते.माहितीचा अधिकार चे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी उत्तम असे मार्गदर्शन करुन कायद्याचे संरक्षण व संवर्धन आणि एकजूट कशी करावी याचे प्रेरणदायी मार्गदर्शन केले.या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी यांनी आपल्या मनोगतात महितीचा अधिकार आणी त्यांचे महत्व समजून सांगितले.
            संपर्क प्रमुख खालापूर- सुरेश गावडे,संघटक - गजानन साळवी,मधुकर गुरव,यशवंत सकपाळ,नरेंद्र पार्टे,अनिल भरतुक,किशोर मोरे,उमेश साळवी,परशुराम मिरकुटे, श्वेता मणवे,अलका विरभद्रे , सुनिल प्रबळकर,सुभाष प्रबळकर,ज्ञानेश्वर लंबडे, निलेश मोरे,प्रशांत पाटील तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खालापूर तालुका,अध्यक्ष वसंत पाटील यांनी केले. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तालुका भाजप प्रभारी मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या संकल्पनेतून क्रिकेट सामने