युवा प्रतिष्ठानांच्या माध्यमातून ढेकू येथे शिवजयंती साजरी,नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्या उपस्थिती

 

युवा प्रतिष्ठानांच्या माध्यमातून ढेकू येथे शिवजयंती साजरी,नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्या  उपस्थिती  




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापुर : २१ फेब्रुवारी,                         

         हिंदुचे अराध्य दैवत,जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ढेकू येथे गेले १३ वर्षे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी चे नरेश पाटील यांच्या माध्यमातून साजरी करण्यांत आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवप्रतिमेचे पुजन   खालापूर चे नायब तहसिलदार सुधाकर राठोड यांच्या हस्ते करण्यांत आले.  
             या शिवजयंती च्या निमित्ताने विविध उपक्रम हाती घेण्यांत आले.विद्यार्थ्यांनी विविध वेषभुषा करीत उपस्थितांची मने जिंकली.त्याच बरोबर सुप्रसिद्ध भजन सम्राट विशाल बुवा रसाळ व महेश बुवा देशमुख यांनी आपल्या सुमधुर आवाजाने शिव प्रेमींना मंत्रमुग्ध केले.
         या कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सभापती नरेश दादा पाटील, अशोक सुसलादे,अजित देशमुख,विनोद खवले सरपंच- प्रकाश पाटील सरपंच - सुनील सुखदरे , राजूदादा पाटील, प्रशांत पाटील, भालचंद्र पाटील सदस्य साजगाव ग्रामपंचायत- गणेश नाना पाटील, दिलीप सुखदरे, अजित जाधव, नीतीन पाटील, अनिल पाटील, मोरू आण्णा देशमुख यांच्या सह साजगाव ढेकू पंचक्रोशी विभागातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित शिवजयंती साजरी करण्यांत आली.

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश