शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य प्रशिक्षण व अभ्यास दौरा संपन्न
राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था हैद्राबाद येथे प्रशिक्षण
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
तळा : कृष्णा भोसले,
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि प्रधान मंत्री कृषी सिंचन योजना (IWMP) २.० अंतर्गत तळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आंतरराज्य तीन दिवशीय शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर अभ्यास दौरा दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ ते १९ फेब्रुवारी २०२५ रोजी राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (NIPHM) हैद्राबाद तेलंगणा येथे प्रकल्प संचालक आत्मा रायगड वंदना शिंदे, उपविभागीय मृद संधारण जलसंधारण अधिकारी माणगाव व तालुका कृषी अधिकारी- आनंद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.या अभ्यास दौऱ्याचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीक्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व जैविक शेती विषयी प्रशिक्षित करणे हा होता.
प्रशिक्षण वअभ्यास दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राष्ट्रीय वनस्पती आरोग्य व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था(NIPHM) येथील विविध प्रयोगशाळांना शेतकऱ्यांनी भेटी दिल्या या दरम्यान प्रयोगशाळा प्रमुख डॉ.शैलजा यांनी मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. गिरीश यांनी ट्रायकोडर्मा, ऍझोटोबॅक्टर व सुडोमोनास यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले. दुपारील सत्रात डॉ. श्रीलता यांनी नैसर्गिक शेतीमधील निविष्ठा निर्मिती व त्याचा वापर याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले.
दुसऱ्या दिवशी कोतूर येथे BRC प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. सदर भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध नैसर्गिक निविष्ठा याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुपारील सत्रात डॉ. लावण्या यांनी बिव्हेरिया आणि व्हर्टिसिलियम कीटकनाशक यांची निर्मिती व वापर याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. शैलाजा यांनी शत्रू कीटक व मित्र कीटक याविषयी मार्गदर्शन केले.
तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती NIPHM चे संचालक डॉ. ओपी शर्मा यांचे उपस्थितीत साजरी केली. त्यानंतर डॉ. सुनंदा साहू यांनी अँटोमोपॅथोजेनिक नेमाटोड्स चे उत्पादन व वापर याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात डॉ. सुधाकर यांनी नैसर्गिक शेतीमधील कीड रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करून प्रक्षेत्र भेटी दरम्यान शेतकऱ्यांना मित्र कीटक व शत्रू कीटक यांची ओळख करून देऊ त्यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर मा. संचालक NIPHM श्री ओपी शर्मा यांचे अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांची अभिप्राय व प्रमाणपत्र वाटप करण्यात येऊन अभ्यास दौऱ्याचा समारोप करण्यात आला.या शेतकरी अभ्यास दौऱ्यामध्ये तळा तालुक्यातील ३० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला या शेतकऱ्यांन समवेत कृषी सहाय्यक गोविंद पाशीमे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा सचिन लोखंडे उपस्थित होते.
---------------- चौकट ----------------
या प्रशिक्षणाचा फायदा शेतकरी उत्पादन गट व शेतकरी उत्पादक कंपनी यांना स्वनिर्मित जैविक निविष्ठा संसाधन केंद्र स्थापन करणेसाठी होणार आहे.
प्रकल्प संचालक आत्मा रायगड अलिबाग - वंदना शिंदे
0 Comments