मुलींनी आणि महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी प्रवीण काकडे

 मुलींनी आणि महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी प्रवीण काकडे



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २२ डिसेंबर                      


               सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात जीवन जगत असताना महिलांनी व मुलींनी आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केले.
              शाहुवाडी तालुक्यातील म्हाळसावडे मालाईवाडा कोथोली येथील अतिदुर्गम भागातील मुली व महिलांना सॅनिटरी पॅड विहस्पर वाटप करताना बोलत होते आजही डोंगर दर्या खोऱ्यातील मुली किंवा महिला यांना सुविधा मिळणेसाठी शहरी भागात जावे लागते डोंगर दर्या खोऱ्यातून जायचं म्हटलं चालत जावे लागते ते म्हणजे किमान ६ ते ७ चालत  किलोमीटरचे पुढे प्रवास करावा लागतो मग जात असताना वन्य प्राण्यांची भिती असते आजही डोंगर दर्या खोऱ्यातील समाज बांधव यांना आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत हे दुर्दैव आहे म्हणून अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट चे वतीने आरोग्य बाबतीत जनजागृती करुन महिला मुली यांना आरोग्य बाबतीत सक्षमीकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
                  यावेळी तिन्ही वाड्यावर १३४ मुलींना महिला यांना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले त्यावेळी प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ सिदधु सडेकर राज्य कार्यकारिणी सदस्य सखाराम सडेकर शहर अध्यक्ष सतिश थोरात कराड तालुका अध्यक्ष पुनम येडगे संगीता झोरे कविता येडगे बयाबाई कोळेकर शालिनी अडुळकर दिपाली कात्रट रुपाली बोडके सोनाली मुढे इत्यादी उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तालुका भाजप प्रभारी मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या संकल्पनेतून क्रिकेट सामने