हातोंड ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न,सहा शाळांनी घेतला सहभाग
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३ फेब्रुवारी,
सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषदेच्या शाळांचे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधतं, संविधान प्रास्ताविकेचे वाचन करुण , संविधान जनजागृती साधत , क्रिडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सुधागड तालुक्यातील प्रतिष्ठित असलेली डोंगरी भागातील हातोंड ग्रामपंचायत असून या हद्दीतील शाळेतील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पहिल्यांदाच हा ऐतिहासिक उपक्रम राबविण्यात आला, या सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा - हातोंड, माठल, केळगान, गोंदाव, कसईशेत, व पत्र्याची वाडी या सहा शाळांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेत लंगडी, कब्बडी , धावणे, लींबू चमचा, गोळा फेक, थाळी फेक, वयक्तिक नृत्य स्पर्धा, सामायीक नृत्य स्पर्धा, नाट्य अभिनय, वक्तृत्व स्पर्धा, आदी स्पर्धा पार पडल्या.
ग्रामपंचायतने सामाजिक बांधिलकी जपत खेड्यातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम राबविला त्याबद्दल ग्रामपंचायतचे शाळांनी आभार मानले.यावेळी पाली पोलीस स्टेशनंच्या एपीआय - अश्विनी मोहिती, मुबंई पोलीस - राजेंद्र वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते दर्शन गोळे, हातोंड ग्रामपंचायतचे सरपंच रमेश वाघमारे, उपसरपंच अनंता पाठारे, केंद्र प्रमुख घनश्याम हाके, ग्रामसेविका ज्योती मदने, माजी उपसरपंच नितीन वाघमारे, हातोंड शाळेचे शिक्षक लहू जायभाये, जयश्री फुंदे, गोकुळ गायकवाड,चंद्रकांत बोडेकर, संदीप म्हात्रे, देविदास जाधव, शंकर जेधे, विकास चाटे, स्वप्नाली गोळे, पंकज पाठारे, ज्ञानेश्वर घोंगे, संजय कडू, मोतीराम क्षीरसागर, रघुनाथ वाघमारे, सुनंदा वाघमारे, अर्चना वाघमारे, आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments