दाखले देण्यांसाठी वाजवी पेक्षा जास्त शुल्क,सुरेश गावडे यांचे तहसिलदार यांस निवेदन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर /चौक ४ फेब्रुवारी
खालापुर तहसील कार्यालयातील ऑपले सरकार सेवा सेतू केंद्र,च्या माध्यमातून जनतेला दिले जाणारे दाखले व विविध प्रकारच्या सेवाचा अधिक शुल्क बेकायदेशीर पणे मोठ्या प्रमाणात घेत असून या भ्रष्टाचार करणाऱ्या सेतुचालकावर त्वरित फौजदारी कारवाई करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे यांनी आक्रमक भुमिका घेतली असून संबधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यांचे निवेदन तहसिलदार अभय चव्हाण यांस दिले आहे.
आपले सरकार सेवा केंद्राची प्रत्येक महिन्यास तपासणी केली जाते.मात्र,तहसीलदार कार्यालाया कडून तपासणी होतच नाही असे सिद्ध झाले आहे.कारण तपासणी होत असती तर संबंधित भ्रष्टाचार समोर उघड झाले असते.मात्र सेतू केंद्र चालकाला पाठीशी घातले जात असून हे सिद्ध होत आहे.या सर्व प्रकरणाची शासकीय नियमानुसार योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर तालुक्यातील नागरिकांना न्याय मिळाला हवा
त्याच बरोबर या सेतू सेवा केंद्र चालकांनी शासकीय सेवांचा दर फलक असावा,नागरिकांसाठी आसन व्यवस्था, पंखे, पिण्याचे पाणी,शुल्क निश्चित केलेली पावती देणे,दाखल्यांसाठी ठरवून दिलेले दर केंद्रावर प्रसिद्ध करावे,वेळेनुसार सेवा बजवावी,काही तक्रार असल्यास, त्यांना टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर उपलब्ध करून द्यावा व समोर डिस्प्ले लावण्यांत यावे.अश्या स्वरुपाचे निवेदनात मुद्दे गावडे यांनी नमुद केले असून,शासकीय स्तरावर पाठविण्यांत आले आहे.

0 Comments