लायन्स क्लब खालापूर अध्यक्ष पदि किशोर पाटील यांची नियुक्ती

 लायन्स क्लब खालापूर अध्यक्ष पदि किशोर पाटील यांची नियुक्ती 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा  
खालापूर  : ८ मे,

            लायन्स क्लब खालापूर ची नुकताच नविन  कार्यकारीची निवड संतोष जंगम यांच्या निवास स्थांनी झाली.यावेळी तालुका अध्यक्ष पदि किशोर पाटील यांची सहमताने निवड करण्यांत आली.पाटील हे अध्यक्ष पदाचे मानकरी होताच,राजकीय,सामाजिक,शैक्षणिक आश्या विविध स्थरातील मान्यवरांनी त्यांस शुभेच्छा दिल्या.
              लायन्स क्लब च्या पदाधिकारी यांचे काम महत्वपुर्ण असून,विविध उपक्रम राबविण्यांत ते सातत्याने अग्रेसर असतात.अदिवासी वाडी,ग्रामीण शाळा,तसेच आरोग्य शिबीर,शाळेय साहित्य,जिवनाश्यक वस्तू तसेच विविध कॅम राबवून जनतेची सेवा करण्यांचे काम सातत्याने ते करीत आहे.यामुळे तालुक्यात लायन्स क्लब च्या कामाची सातत्याने चर्चा होत असतांना पहावयांस मिळत आहे.
             किशोर पाटील हे अध्यक्ष पद विराजमान होताच त्यांस संस्थापक अध्यक्ष - शिवानी जंगम,प्रथम उपाध्यक्ष - भरत पाटील,द्वितीय उपाध्यक्ष - हरिभाऊ जाधव,सेक्रेटरी - लहु भोईर,खजिनदार - जितेंद्र सकपाळ,जिल्हा सहाय्यक सचिव - ज्योती देशमाने,जिल्हा समन्वयक - नागेश देशमाने अदि कार्यकारणी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
            

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर