सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली बीजेपी मध्ये तरुण वर्गांचा प्रवेश


भाजपा खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली खालापूर तालुक्यातील तरुणांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश,




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : ७ फेब्रुवारी,

                  खालापूर तालुक्यातील अनेक तरुणांनी पनवेल चे आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन खालापूर पुर्व मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली आज खारघर येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर,पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर , जिल्हाध्यक्ष अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत खालापूर पूर्व मंडलातील तरुणांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झाला.
               केंद्रात नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार असल्याने अनेक तरुण कार्यकर्ते भाजपकडे प्रभावित होत असून लवकर अनेकजण भाजपा मध्ये प्रवेश करणार आहेत.असे वक्तव्य भाजपा खालापूर पुर्व मंडळ अध्यक्ष सनी यादव यांनी सांगितले.यावेळी तालुका युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील, विकास रसाळ तालुका चिटणीस, अभि कदम, भरत महाडिक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
               यावेळी ग्रामपंचायत देवन्हावे येथील दहिवली गावातील रोणीत म्हात्रे, अजय खताळे,राहुल पाटील , तुषार जाधव , जय भिल्लारे, साहिल केदारी , आत्करगाव येथील महेश निरगूळकर, दिपक मांगुळकर, राहुल शिंदे, कल्पेश साळवी अंजरून गावातील नितेश वाघमारे ,केतन वाघमारे ,सचिन वाघमारे ,अक्षय वाघमारे,समीर पवार आदि कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
            

Post a Comment

0 Comments

उपसरपंच पदि वंदना सुधाकर महाब्दी बहुसंख्येने विजयी