धनगर चषकाचा मानकरी ठरला शिवशंभो मित्र मंडळ

 धनगर चषकाचा मानकरी ठरला शिवशंभो मित्र मंडळ, तर द्वितीय क्रमांक ए वन क्रीडा मंडळ जैतापूर याने पटवकावीला,



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे                                                खोपोली : २२ फेब्रुवारी

               खेड तालूका धनगर समाज आयोजित धनगर चषक कब्बडी (स्पर्धेचा )मानकरी ठरला शिवशंभो मित्र मंडळ देवाचा डोंगर, तर दुसरा क्रमांक ए वन क्रीडा मंडळ जैतापूर, आणि तिसरा क्रमांक  जननी वाघजाई प्रतिष्ठान वावे सातपाने  या संघाने पटकवीला.                                                                 गृहराज्य मंत्री नामदार  योगेश कदम यांच्या ३९ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खेड तालूका धनगर समाजाच्या वतीने धनगर चषक कबड्डी स्पर्धाचे  आयोजन करण्यात आले होत्या,ह्या स्पर्धा १८ फेब्रुवारी रोजी रोजी चाटव (खेड ) येथे पार पडल्या,या स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक सद्गुरू नाना कदम यांच्या हस्ते करण्यात आले.                                                                               या स्पर्धेत शिवशंभो मित्र मंडळ देवाचा डोंगर याने प्रथम क्रमांक मिळवला, तर द्वितीय क्रमांक ए वन क्रीडा मंडळ जैतापूर आणि तिसरा क्रमांक जननी वाघजाई प्रतिष्ठान वावे सातपाने या संघाने पटकवीला,या संघाना पारितोषिके आणि रोख रक्कम मंत्री  योगेश कदम यांच्या हस्ते आणि नगरसेवक सदगुरु नाना कदम यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले,ही स्पर्धा पार पाडण्यासाठी खेड तालुक्यातील  धनगर समाज बांधव युवा कार्यकर्ते, वाघजाई देवी प्रतिष्ठान चाटव यांनी विशेष मेहनत घेतली.                                          यावेळी शिवसेना खेड तालूका शिवसेना प्रमुख सचिन धाडवे, तालूका संघटक महेंद्र भोसले,कोकण धनगर विकास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पी डी गोरे, सचिव गनपत गोरे, जेष्ठ समाज सेवक रामचंद्र आखाडे,  कॅप्टन श्रीपत कदम, डी डी आखाडे, अस्तान ग्रामपंचायत सदस्य राम कदम, सुजाता कदम, जिल्हा परिषद सदस्या दर्शना मोरे, पोलीस धोंडू जानकर, कोकण धनगरवाडे नागरी पतपेढी संचालक दिपक जानकर, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली गोरे, माजी सैनिक काळू गोरे, दगडू आखाडे,लक्ष्मण बर्गे, शेखर यादव दिपक अवकीरे रामचंद्र ढेबे योगेश वरक, आदिसह अनेक क्रीडा प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश