युवा प्रतिष्ठान वतीने,हळदीकुंकू चे आयोजन,सुरेखा अलीमकर ठरली स्कुटीची मानकरी,बीजेपी नरेश पाटील यांचा पुढाकार

 युवा प्रतिष्ठान वतीने,हळदीकुंकू चे आयोजन,सुरेखा अलीमकर ठरली स्कुटीची मानकरी,बीजेपी नरेश पाटील यांचा पुढाकार 






माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २०  फेब्रुवारी,


             भारतीय जनता पार्टी, ढेकू व नरेश पाटील युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महिलां वर्गांसाठी हळदीकुंकू सोहळा व खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी हजारो महिला भगिनींनी हळदीकुंकू सोहळा व खेळ पैठणीच्या कार्यक्रमात उपस्थिती लक्षणीय असल्यांचे पहावयांस मिळाले.
               या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण खेळ रंगला पैठणीचा सिनेअभिनेते क्रांतीनाना मालेगावकर व बाळ कलाकार छोटी अभिनेत्री सह्याद्री मालेगावकर यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.खेळ रंगला पैठणीचा या  कार्यक्रमासाठी भरघोस बक्षिसे देण्यात आली.त्याच बरोबर हळदीकुंकू संभारंभासाठी आलेल्या हजारो महिला भगिनींना हळदीकुंकू वाण म्हणून साडी भेट देण्यात आली.
                        ह्या स्पर्धेतील मुख्य आकर्षक लकी ड्रॉ कुपन मुळे गरीब घरातील महिला सुरेखा आलीमकर स्कुटी भेट देण्यात आल्यामुळे महिलांनी तिचे अभिनंदन केले.खेळ रंगला पैठणी कार्यक्रमात विभूती सौरव दहिफळे साजगाव प्रथम क्रमांक, बक्षीस एल ई डी टीव्ही व पैठणी, द्वितीय क्रमांक मोनाली रोहिदास पाटील,बक्षीस शेगडी, तृतीय क्रमांक प्रणिता तेजस बोर्ले बक्षीस कुलर, चतुर्थ क्रमांक शीतल पुनीत पाटील बक्षीस मिक्सर,पाचवा क्रमांक लीना मंगेश पाटील बक्षीस कुकर यांस बक्षीस देण्यात आले. 
         यावेळी खालापूर तालुक्यातील ऋतिका पाटील मिस खोपोली व भाग्य दिले तू मला कलर्स मराठी फेम , शिवण्या बोराडे लिटिल रिल स्टार व ह. भ . प. सचिन महाराज तांडेल शुभ विवाह झी मराठी फेम यांचा गौरव करण्यात आला.ह्या कार्यक्रमासाठी खासदार धैर्यशील पाटील,मा.आमदार सुरेशभाऊ लाड, भारतीय जनता पार्टी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे,दिपक बेहरे सरचिटणीस उत्तर रायगड भाजपा , खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव
             तसेच राजेश लाड, संदीप पाटील,प्रकाश पाटील सरपंच- विनोद खवले सरपंच- अंनता पाटील, रविंद्र पाटील खालापूर तालुका सरचिटणीस-हरिभाऊ जाधव,  भाजप शहर अध्यक्ष खालापूर -  दिपक जगताप,रमेश रेटरेकर, हेमंत नांदे,सुजाता ताई दळवी भाजप खालापूर तालुका अध्यक्ष - निकिता हेलंडे, श्वेताताई मनवे, , स्नेहल सावंत,विकास रसाळ, भालचंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्य- प्रवीण मनवे , राजू दादा पाटील, प्रशांत पाटील,यांच्या सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद मा. सभापती नरेश पाटील युवा प्रतिष्ठान मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हणून कार्यकर्ते यांची ललकारी