शुभम जरगला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य,अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ७ फेब्रुवारी,
शुभम जरग( रा. येतगाव ता. कडेगांव जि. सांगली) येथील असुन तो आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर विटा येथे इंजिनिअरिंग चे दुसरें वर्षात शिक्षण घेत आहे, त्याची परिस्थिती अत्यंत गरिबीची आणि हलाखीची असुन त्याला शिक्षण घ्यायची खूप इच्छा असल्यामुळे आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीचे आहे.आई मोलमजुरी करून शिक्षणासाठी हातभार लावत आहे.असतांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे यानी पाच हजार रुपये धनादेश देण्यांत आला.
शुभम यांस एक बहिण असुन ती सुद्धा शिक्षण घेत आहे.नुकतेच त्याच्या वडीलाचे व्यसनाधीनतेने निधन झाले, असून त्यांच्या कुटूंबाची सर्व जबाबदारी आईवर आहे.त्यांना घर चालवण्यासाठी दुसरे कुठलेही उत्पन्न नाही याची माहिती प्रवीण जरग यांनी ही ट्रस्ट नेहमीच गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक सहकार्य करत असते, आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व वैद्यकीय मदत केली आहे, त्याच प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपण्यांचे काम करीत आहे.जपत शुभम यांना अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदत करीत आहेत.
तो धनादेश मायाक्का देवीच्या भंडाऱ्याच्या सोहळ्यात दिला यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, व अनिल जरग,सहायक पोलिस निरीक्षक प्रा.बाजीराव वावरे, मारुती जानकर,प्रवीण जरग,भारती विद्यापीठ पुणे बजरंग जरग, भिमराव जरग, सत्यवान जरग, चैतन्य काकडे उपस्थित होते.
.jpg)
0 Comments