मैत्री चषकचा,मानकरी ठरले गावदेव टेंभरी संघ ,तर द्वितीय क्रमांक राधाकृष्ण सावरोली संघ
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी पाताळगंगा : ११ मार्च
मैत्री चषकांच्या माध्यमातून श्री गावदेवी प्रसन्न,माजगाव ,वारद यांच्या वतीने डे नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन उद्योजक यशवंत शिंदे,व मारुती ढवाळकर यांच्या माध्यमातून पीपीएल कंपनीच्या समोर असलेले सोमाणी शेठ मैदान येथे घेण्यांत आले.या स्पर्धेत या परिसरातील २८ नामवंत संघांनी सहभाग नोंदविला,अतितटीच्या सामन्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले गावदेव संघ टेंभरी या तर द्बितीय क्रमांक राधाकृष्ण सावरोली संघ,तर तृतीय क्रमांक गावदेवी संघ बोरगाव पेण, या संघानी पटकाविले. ह्या सामन्यात अंतिम विजेत्यास म्हणजे प्रथम क्रमांकास १, लाख रुपये,द्वितीय क्रमांक ५०, हजार तर तृतीया क्रमांक यांस २५,हजार रुपये,तसेच भव्य चषक देण्यात आले.या स्पर्धेचा अंतिम सामन्यात राधा कृष्ण सावरोली संघाचा पराभव करून गावदेव टेंभरी संघाने प्रथम क्रमांक पटकावले.
0 Comments