खालापूर नगर पंचायत मधील घरपट्टी पावती घोटाळेबाजांवर कारवाई करा

 खालापूर नगर पंचायत मधील घरपट्टी पावती घोटाळेबाजांवर कारवाई करा,खालापूर तालुका व शहर भाजपा यांच्याकडून लेखी निवेदन




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १२ मार्च,

              खालापूर नगरपंचायत कार्यालयात ऑनलाईन पावती रद्द करून लाखाची रक्कम हडप केल्याने लेखापरीक्षणात उघड झाल्यानंतर देखील कारवाई न झाल्याने भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका व खालापूर शहर भाजपा यांच्यावतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
                जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत दैनदिन घरपट्टी भरणा चलन व घरपट्टी पावती यांचे लेखापरीक्षणात ऑनलाईन पद्धतीने तयार करण्यात आलेल्या पावत्या संबंधित पावती रक्कम लेखापाल यांचेकडे जमा न करता नगरपंचायत मधील कर्मचारी यांचे लॉग इन आयडी वापरून रद्द केल्याचे माहिती अधिकारात उघडकीस आले होते. 
             गेल्या वर्षीही अशाच प्रकारचा भ्रष्टाचार झाला होता.या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असताना पुन्हा अशाप्रकारे नागरिकांच्या पैशावर पुन्हा डल्ला मारण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.यावेळी भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष सनी यादव, अध्यात्मिक आघाडी जिल्हा संयोजक काशिनाथ पारठे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले, खालापूर भाजप शहर अध्यक्ष दिपक जगताप, विकास मोरे, ज्ञानेश्वर पारंगे, विशाल लोते, लक्ष्मण जाधव, अभि कदम, रोनीत म्हात्रे व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
                   
            ----------------चौकट ------------
           दोषींवर कारवाई करण्यात यावी यासाठी खालापूर तहसीलदार, खालापूर पोलीस ठाण्यात पत्र देण्यात आले खालापूर हे तालुक्याचे ठिकाण असून नगरपंचायत झाल्यापासून कोणत्याही प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध नसून संबंधितावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे.
सनी यादव भाजपा खालापूर मंडळ -  अध्यक्ष

Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हाणून कार्यकर्ते यांची ललकारी