रांगोळी स्पर्धेत स्नेहा सुनील जगताप प्रथम तर पाककला स्पर्धेत सुरेखा गोरख मोरे प्रथम
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ९ मार्च,
महिला दिनाचे औचित्य साधत खालापूर नगरपंचायत यांच्या वतीने खालापूर शहरात रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते.या मध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयांस मिळाला.या रांगोळी स्पर्धेत स्नेहा सुनील जगताप प्रथम तर कांचन निधी द्वितीय, दर्शना चव्हाण तृतीय क्रमांक मिळविला.तसेच पाककला स्पर्धेत सुरेखा मोरे प्रथम तर पूनम फासे द्वितीय, संस्कृती खडकबाण तृतीय क्रमांक मिळविला. यावेळी महड देवस्थान अध्यक्षा मोहिनी वैद्य यांच्या हस्ते विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देत गौरविण्यात आले.
महिला दिनाचे औचित्य साधत खालापूर नगरपंचायत हद्दीतील महिलांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणाचा संदेश देत आलेल्या सर्व महिलांना तुळशीची रोपे भेट देण्यांत आली. तुळस ही धार्मिक तसेच आरोग्यदायिक असून ग्रामीण तसेच शहरी भागात तुळशी वृंदावन ही असते.या उद्दात विचारांतून हे वृक्ष भेट देअण्यांत आली.
यावेळी रोशना मोडवे नगराध्यक्षा, बांधकाम सभापती उज्ज्वला निधी, नगरसेविका लता लोते, मीनल कांबळे,मीना वाघमारे,शिवानी जंगम,सुनीता पाटील व नगर पंचायत कार्यालय अधीक्षक जितेंद्र यादव, सुनील विश्वासराव लेखापाल खालापूर नगर पंचायत, प्रणित भोसले रचना सहाय्यक,सुवर्णा जगताप लिपिक, सुधीर गायकवाड, अनिल गायकवाड, विद्या गायकवाड आदी नगर पंचायत कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments