शाळेतील जुन्या आठवणीत रमले विद्यार्थी,२५ वर्षातून पुन्हा आले एकत्र
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : १३ मार्च,
कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा खरसुंडी येथे शालेमध्ये शिक्षण घेत असतांना प्रत्येक जण एक तरी आपली आठवण स्मरणात ठेवत असतात.शिक्षण पुर्ण झाले की प्रत्येक जण आपल्या प्रवासाला लागत असतो.मात्र सन २००० मध्ये १० वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थीना व्हॉट्स अप नी जोडले गेले.सोशल मिडिया आपल्यासाठी किती लाभदायक असून त्याचा योग्य वापर केल्यास आपणांस लाभ मिळत असतो.या माध्यमातून आपण एकत्र यावे व शाळेतील जुन्या आठवणी ताज्या करण्यांसाठी चौक हद्दितील आसरे गाव येथिल असलेले शारदा फार्म हाऊस या ठिकाणी पंचविस विद्यार्थी एकत्र आल्यांचे या ठिकाणी पहावयांस मिळाले.
शाळेय जिवन किती मस्त होते.रोज सर्व मित्र एकत्र येणे गप्पा गोष्टी करणे.त्यांचा डब्बा खाणे असे नित्यनेमाणे होत असायचं मात्र दहावीची परिक्षा झाली तसे जुणे वर्गमित्र विविध शाखेत दाखल झाले.मात्र आपल्याला सातत्याने त्यांची उणीव भासत राहत असते.काही घरच्या परस्थितीमुळे अर्धावरती शाळा सोडवी लागली.आपण सर्वांनी एकत्र यावे या उद्दात विचारांतून या गेट टुगेदर चे नियोजन करण्यांत आले. यावेळी जुन्या आठणींना उजाळा दिला.
आपण शाळेत असलेले शिक्षक त्यांची शिकविण्यांची पद्धत आश्या अनेक विचारांत मन तलीन झाले होते.यावेळी या ठिकाणी मनोसोक्त गप्पा मारीत पुन्हा एकदा आपण शालेय बाळपण अनुभविले असलेल्यांचे मत रत्नाकर बारस्कर,प्रविण म्हामुणकर,उषा शेडगे,महेश निमणे,अर्चना महाडीक,रुपेश पोळेकर,सविता गायकवाड,स्वप्निल देवघरे,ज्योती खोपकर,दिपक मोरे,भरत ढवालकर,काळूराम जाधव,सुजाता गायकवाड,सुहास गायकर,जयश्री लाड,रुपाली कदम,कैलास शिंदे,सुषमा कदम,शर्मिला महाब्दि,संदेश सालेकर,बेबी देवघरे,दिपा पिंगळे,दिनेश लाड,निलेश महाडिक,सुनिल ढगे,राजेश्री म्हामुणकर,रविंद्र भोईर यांनी व्यक्त केले.
0 Comments