खालापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भाई जगनाथ ओव्हाळ यांची बिनविरोध निवड स्थानिक पत्रकारितेला नवे बळ !
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : १५ मार्च,
खालापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार भाई जगनाथ ओव्हाळ यांची बिनविरोध निवड झाली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पत्रकारिता अधिक बळकट होणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाई जगनाथ ओव्हाळ हे पत्रकारितेत गेल्या अनेक वर्षांपासून समाजहितासाठी कार्यरत आहेत. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची जबाबदारी ते निष्पक्षपणे आणि निर्भीडपणे पार पाडत आहेत.
सामाजिक प्रश्न, अन्याय, प्रशासनातील पारदर्शकता यासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका घेत समाजहितासाठी प्रभावी लेखन करीत आहे.त्यांच्या निवडीबद्दल वंचित बहुजन आघाडी, खोपोली शहर अध्यक्ष व संपूर्ण कमिटीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
"पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून, समाजपरिवर्तनाचे प्रभावी हत्यार आहे. या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे मत नवनियुक्त अध्यक्ष भाई जगनाथ ओव्हाळ यांनी व्यक्त केले. भविष्यात खालापूर प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी प्रभावी भूमिका घेतली जाणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार संघटनांचे प्रश्न सोडवण्यावर भर दिला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
0 Comments