भारतीय रत्न सन्मान पुरस्कारांने महेश निमणे यांस सन्मानित

 भारतीय रत्न सन्मान पुरस्कारांने महेश निमणे यांस  सन्मानित 






माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : १७ मार्च,

          खोपोली येथे सुखी वास्तु स्पिरिचुअल सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून आजवर अनेकांचे संसार सुखी समृद्धी केले असल्यामुळे त्यांस आजवर अनेक पुरस्कारांने सन्मानित करण्यांत आले आहे.नुकताच राम मोहन बाजपाई यांच्या डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम फाउंडेशन, लखनऊ या एनजीओ आणि वर्थी वेलनेस फाउंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यास महेश निमणे यांस भारतीय रत्न सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यांत आले.सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. 
           मानव जिवन जगत असतांना अनेक समस्या निर्माण होत असतात.मात्र योग्य वेळी मार्गदर्शन मिळाले की जिवन सुखमय होत असते.प्रत्येक कुटुंब सुखी समाधानी राहावे यासाठी महेश निमणे प्रत्येकांच्या समस्यांने निराकारण करीत आहे.लोकांच्या समस्या या सोडविण्यांसाठी रेकी, वास्तुशास्त्र, हस्त्ररेषा रीडिंग, लोलकशास्त्र पद्धती, व काउंसलिंगने सेवा म्हणून नैसर्गिक उपचार पध्दतीनुसार करीत आहे.
            सातत्याने अनेक कौटुंबिक समस्या सोडविण्यात अग्रेसर असून जिल्हासह महाराष्ट्रात अविरत सेवाकार्य करित असून गेल्या काही वर्षात ''पुणे उद्योग भुषण'' पुणे,
 ''टायकुन्स ऑफ महाराष्ट्र'' नाशिकमधे, तर ''वास्तुश्री पुरस्कार'' संभाजी नगर येथे देण्यांत आले.तसेच ''खोपोली पद्मश्री'' २०२५ चा  पुरस्कार प्रदान करण्यात आले.यावेळी महेश निमणे यांस साहित्य गुरुवर्य डॉ. सुभाष कटकदौड यांनी पुढिल वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हणून कार्यकर्ते यांची ललकारी