वनरक्षक नितीन कराडे यांना महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आदर्श वनरक्षक पुरस्कार
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २९ मार्च,
नवभारत आणि नवराष्ट्र समुहाच्या वतीने नुकतेच पुरस्कार सोहळा पार पडला असून खोपोली येथील वनरक्षक नितीन मारुती कराडे यांना आदर्श वनरक्षक पुरस्कार महिला व बालकल्यान मंत्री आदिती तटकरे आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात देऊन सन्मानीत करण्यात आले,
वनरक्षक नितीन कराडे यांनी गेल्या अनेक वर्ष वनविभागात प्रामाणिक पणे काम केले आहे, त्यांच्या कार्यकाळात खोपोली येथे अनेक जंगली प्राण्यांना होणारे अपघातत ते तातडीन मदत करून अनेक प्राणी आणि पक्षांचे जीव वाचवले असल्याने त्यांच्या या कार्याची दखल नवभारत आणि नवराष्ट्र समूहाने घेतली असून त्यांना आज आदर्श वनरक्षक पुरस्कार देण्यात आला.
त्यांना हा पुरस्कार मंत्री आदिती तटकरे आणि रायगडचे पोलीस अधिकक्ष सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते देण्यात आला आहे.त्यांना पुरस्कार मिळताच वनरक्षक नितीन कराडे यांचे कौतुक होऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत
0 Comments