ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी येथे माझी वसुंधरा अभियान अंतर्गत महिला वर्गांस जनजागृती शिबीर
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
टेंभरी : ३० मार्च,
माझी वसुंधरा अभियान ५.० च्या अंतर्गत,ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी यांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरण करण्यांसाठी विविध कार्यक्रम आयोजन तसेच जनजागृती करण्यांत आली.यावेळी प्लॅस्टिक बंदि, फटाके बंदी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, अदि मार्गदर्शन करण्यांत आले.आपला परिसर स्वच्छ ठेवण्यांसाठी तसेच पर्यावरणांचा समतोल अबाधित राहण्यांसाठी हा उपक्रम हाती घेण्यांत आला.
ग्रुप ग्राम पंचायत टेंभरी विविध उपक्रमातील घेत असताना सामाजिक बांधिलकी जोपासण्यांचे काम करीत आहे.यावेळी महिला वर्गांस प्लास्टिक चे दुष परिणाम विषयी माहिती देण्यांत आली.तसेच घरातील निघणा-या कच-यांचे वर्गीकरण करावे,त्यांच बरोबर सांडपाणी योग्य विल्हेवाट लावावे,पिण्यांसाठी शुद्ध पाण्यांचा वापर करावे,असे मार्गदर्शन यावेळी महिला वर्गांस करण्यांत आले.यावेळी प्रत्येक महिला वर्गांस डस्टबिन वाटप करण्यांत आल्या.या कार्यक्रमास महिला वर्गांची उपस्थित मोठ्या प्रमाणात पहावयांस मिळाली.
या कार्यक्रमाचे आयोजन सरपंच - रमेश गायकवाड,उपसरपंच - निलेश ठोंबरे,ग्रामसेवक - गोकुळदास राठोड,सदस्या - प्रतिभा भोईर,दर्शना फाटे,अंजना भोईर,अपर्णा पवार,निताली बामणे,आशा कातकरी,स्वपना ठोंबरे,सदस्य - निखिल पाटील,जनार्दन मुकणे,रोशन गायकवाड, यांच्या माध्यमातून करण्यांत आले.
0 Comments