कलोतेफाटा ते नडोदे रस्त्यावरील अनधिकृत वॉलकंपाऊड तोडणार,कलोते ग्रामपंचायत अँक्शन मोडवर
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
कलोते : २९ मार्च,
फार्महाऊसच्या मालकांनी कलोतेफाटा ते नडोदे रस्त्याच्या शेजारीच अनधिकृत उंच दगडी वॉलकंपाऊड उभे केले आहेत, वाँलकंपाउंड रस्त्याच्या बाजूलाच असल्यामुळे नव्याने डांबरीकरण करताना रस्ता अरुंद राहिल्यामुळे नागरिकांना वाहतुक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, त्यामुळे नडोदे ग्रामपंचायतीने नाराजी व्यक्त केली आहे. बांधकाम विभागही जबाबदारी झटकत असल्यामुळे अखेर कलोते ग्रामपंचायत अँक्शन मोडवर आली असून येत्या पंधरा दिवसात पोलिसांच्या मदतीने अनाधिकृत वाँलकंपाउड तोडणार असल्याची मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - पुणे जुन्या मार्गाला लागून कलोते फाट्यावरून नडोदेसह अन्य ग्रामीण गावांना जोडणारा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून दररोज असंख्य नागरिकांसह वाहन चालक व प्रवासी वर्गाची ये - जा असते, परंतु या रस्त्याला लागूनच कलोते ग्रामपंचायत हद्दीत कलोते फाटा ते नडोदे मार्गावर मुंबईसह अन्य भागातील काहीचे कंपनीसह फार्महाऊस आहेत. मात्र काही फार्महाऊस व कंपनी मालकांनी कलोते फाटा ते नडोदे गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर खोदकाम करीत वॉलकंपाऊडचे बांधकाम अनधिकृतपणे केल्याने मार्ग अरुंद झाला आहे. तर अनधिकृत दोन्ही साईडच्या वॉलकंपाऊडमुळे दोन मोठी वाहने एकमेकांना पार करताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत असते. त्यामुळे अनधिकृत बांधकामाबाबत सर्वामध्ये नाराजीचा सूड उमटत असून याबाबत अनेकदा संबंधित ग्रामपंचायतीने फार्म हाऊस व कंपनी मालकांना पत्रव्यवहार करुन अनधिकृत बांधकाम हटवावे अशी मागणी केली होती. परंतु अनेकदा पत्रव्यवहार होऊनही आजवर या कंपनी व फॉर्महाऊस मालकांनी बांधकाम हटवले नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तर कलोतेफाटा ते नडोदे रस्त्याच्या डांबरीकरणासाठी कोट्यावधीचा निधी मिळाला असून डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. ठेकेदार अनाधिकृत वाँलकंपाऊडला अभय देत डांबरीकरण करीत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
कलोते फाटा ते नडोदे गावापर्यत रस्त्याचे नूतनीकरण होत आहे, हा रस्ता करताना रस्त्याच्या बाजूला बांधकामे पुढे आली आहे, त्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण मंजूर झालेल्या रुंदीकरण करताना अडचणी आहेत. मात्र हे पुढे आलेले बांधकाम हटविण्याचे अधिकार ग्राम पंचायतीला आहेत, त्यांनी हे काम करणे आपेक्षित आहे. मात्र मंजूर झालेल्या नियमानुसार काम सुरू आहे अशी माहिती कनिष्ठ अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास निकिता गुरव यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
-------------चौकट --------------
कलोते ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या कलोतेफाटा ते नडोदे रस्त्याच्या शेजारीच अनधिकृत वाँलकंपाऊड मालकांना बांधकाम तोडण्यासाठी नोटीस देणार आहोत. पंधरा दिवसात स्वतःहून वाँलकंपाऊड तोडले नाहीतर पोलिसांची मदत घेवून वाँलकंपाऊड तोडणार.
प्रशासक तथा ग्रामविकास अधिकारी कलोते ग्रामपंचायत : निलेश म्हसकर
0 Comments