इंदरदेव धनगरवाडीतील जळालेल्या घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्या - आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी

 इंदरदेव धनगरवाडीतील जळालेल्या  घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्या - आमदार गोपीचंद पडळकरांची विधानसभेत मागणी



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : १७ मार्च,

                रायगड जिल्हातील रोहा तालुक्यातील धामणसई  इंदरदेव येथील  डोंगराला  वनव्यामुळे भीषण आग लागून येथील धनगर समाजाची ४८  घरे या आगीत जळून खाक झाली होती.या घटनेची आमदार गोपीचंद पडळकरांनी तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी जाऊन जळालेल्या घरांची पाहणी केली.विधानसभेत आवाज उठवून त्यांना  नुकसान भरपाई  मिळावी अशी मागणी  विधानसभेत केली. 
              धामणसई इंदरदेव धनगरवाडा हा डोंगरावर असून येथे जाण्यासाठी रस्ता नाही,पाण्याची सुविधा नाही, मात्र आजही धनगर समाज तेथे राहत आहे, नुकताच तेथील डोंगराला लागलेल्या आगीमुळे येथील धनगर समाजाची ४८ घरे पूर्णपणे जळून खाक झाली असून यात घरांचे, वस्तूंचे, जनावरांचा खाद्य हे मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहेत.
                या घटनेची माहिती युवानेते दत्ताभाऊ शेडगे यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना देऊन स्वतः आमदार गोपीचंद पडळकर हे धनगरवाड्यावर पोहचून ग्रामस्थांची भेट घेत जळालेल्या घरांची पाहणी केली. येथील ग्रामस्थांना तात्काळ नुकसान भरपाई  मिळावी यासाठी आज विधानसभेत आवाज उठवत मागणी केली.यामुळे कोकणातील धनगर समाजाने आमदार गोपीचंद पडळकरांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश