इंदरदेव धनगरवाडातील जळीत कुटूंबाना तात्काळ मदत द्या - राष्ट्रीय समाज पक्षाची निवेदनाद्वारे मागणी

 इंदरदेव धनगरवाडातील जळीत कुटूंबाना तात्काळ मदत द्या - राष्ट्रीय समाज पक्षाची निवेदनाद्वारे मागणी




 माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे
खोपोली : १७ मार्च,

         रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडा येथील  वणव्यात ४८  घरे जळून खाक झाली असून त्या कुटूंबाना तात्काळ मदत मिळवून द्या यासाठी नुकतेच  रायगडचे जिल्हाधिकारी,आपत्ती  व्यवस्थापन , आणि वनविभाग आणि तहसीलदार रोहा यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
        इंदरदेव येथील डोंगरावर धनगर समाजाची ४८  घरे असून येथील डोंगराला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली या आगीत येथील संपूर्ण घरे जळून खाक झाली यामुळे ,या घरांचा तात्काळ फेर पंचनामा करून बेघर कुटूंबाना मदत मिळावी यासाठी नुकताच  निवेदन देण्यात आले.या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे, सामाजिक कार्यकर्ते अनंता हिरवे, युवा नेते चंद्रकांत हिरवे, हरेश ढेबे, दत्ता गोरे यांनी या घटनास्थळाची पाहणी करून निवेदन देण्यात आले.
          या निवेदनात कुटूंबाना तात्काळ मदत करून शासनाने त्या ठिकाणी घरे बांधून द्यावीत, आणि त्यांना तेथे रस्ता पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिसह दळणवळनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी हे  निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे, राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तुषार खरिवले, महिला आघाडी अध्यक्षा मनीषाताई ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते अनंता हिरवे, युवा नेते हरेश ढेबे, दत्ता गोरे झ चंद्रकांत हिरवे युवा नेते विजय उघडे,करण ढेबे अदि  उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खालापूर तालुका भाजप प्रभारी मंडळ अध्यक्ष सनी यादव यांच्या संकल्पनेतून क्रिकेट सामने