राज्यात सिबिएसी पॅटर्न राबविल्याबद्दल राज्य सरकारचे आभार,राष्ट्रीय समाज पक्षाचे मानले आभार

 राज्यात सिबिएसी पॅटर्न राबविल्याबद्दल राज्य सरकारचे आभार,राष्ट्रीय समाज पक्षाचे मानले आभार



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २५ मार्च,


 
महाराष्ट्रातील महायुती सरकारने इयत्ता पहिली पासून सिबिएसी अभ्यास क्रम राबविण्याचे घोषित केल्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे महायुती सरकारचे  आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे अभिनंदन करून  आभार मानले आहेत.
          त्यांच्या आभाराचे पत्र पनवेल तहसीलदारांना राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी  दिले आहे. महाराष्ट्र राज्यात  यावर्षी पहिली पासून  सिबिएससी पॅटर्न राबविण्याचा महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळात घेतल्याने राष्ट्रीय समाज
पक्षाने महायुती सरकारचे आभार मानले असून तसे  आभाराचे पत्र पनवेलचे तहसीलदार यांना दिले आहे.
          या अभ्यासक्रमामुळे  महाराष्ट्रातील गोरगरीब आणि उपेक्षित्यांच्या  मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल या उद्देशाने राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी गेली अनेक  वर्ष आंदोलन करून  विधान परिषदेत मागणी केली होती त्या मागणीला अखेर यश आले असून त्यांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश