कुंभिवली ग्राम पंचायत हद्दीतील धामणी गावात नियोजनाअभावी पाणी न आल्याने महिलांचा संताप
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : २५ मार्च,
खालापूर तालुक्यातील कुंभिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जलस्वाराज्य पाणी योजना पिण्याचे पाणी, व वापरण्यासाठी नदी चे पाणी नागरिकांना पाणी पुरवठा ग्राम पंचायतीचे करीत असून खरसुंडी, कुंभिवली व धामणी यासह आदिवासी वाड्या ठाकूर वाड्या असा भाग येत असल्याने या ठिकाणी नागरी वस्ती असल्याने मुबलक पाणी मिळावा यासाठी महिलांची मुख्य मागणी असल्याने मात्र पाण्याचा पुरवठा एक दिवसाआड पिण्याचा व वापरण्याचा येत आहे.मात्र मागील काही दिवसापासून नियोजना अभावी धामणी गावात चार दिवस पाणी न आल्याने महिलांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठून पंचायतीला जाब विचारीत आम्हाला दिवसाआड पाणी द्या असा सवाल उपस्थित महिलांनी केला. आणि यावर पंचायतीने नियोजन करा अशी मागणी केली.
यावेळी सरपंच रेखा वीर,ग्रामसेवक विश्वास वारे,सदस्य परेश गायकवाड,नीलम संजय लोते ,शुभांगी वाघमारे,नरेश मनेर, विशाल म्हामुणकर, ग्रामस्थ अँड कृष्णा पवार,घनश्याम भाऊ वीर तुकाराम लोते,काशिनाथ जगताप उपस्थित होते महिलांनी पाणी योजनेचे पाणी चार चार दिवस येत नाही मोठी ग्रामपंचायत असताना आम्ही घरपट्टी भरत असताना आम्हाला वेळेवर मुबलक पाणी का देत नाही असा संतप्त सवाल व्यक्त करीत आम्हाला पिण्याचे आणि वापरण्यासाठी दिवसाआड पाणी चालेल पण वेळेत नियोजन करा अशी मागणी केली आहे.
यावेळी ग्रामसेवक विश्वास वारे यांनी पाणी नियोजनासाठी नेमलेल्या कर्मचारी वर्गाला जाब विचारत धारेवर धरले आणि कर्मचारी वर्गाला पाणी सोडण्याचे नियोजन करून सूचना केल्या याबाबत महिला नी याबाबत लेखी आश्वासन मागितल्याने महिलांच्या म्हणण्यानुसार लेखी पत्र देण्यात आले.यावेळी धामणी गावासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली यानंतर महिलांनाचा राग शांत झाला आहे.
-------------- चौकट -------------
धामणी गावात दिवसाआड पाणी येत असतो, मात्र मागील चार पाच दिवस पाणी न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली याबाबत आम्ही सर्व महिला ग्रामपंचायत कार्यालयात आलो,आणि आमची पाण्याची समस्या मांडली याबाबत आम्हला सरपंच ,ग्रामसेवक आणि सदस्या च्या उपस्थित पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजन ठरवून लेखी आश्वासन दिले आहे.मात्र यापुढे जर अशीच पाण्याची समस्या राहिली तर आम्ही सर्व महिला आता ग्राम पंचायत कार्यालयात आलो नंतर पंचायत समिती मध्ये जाऊन जाब विचारू
गृहिणी धामणी - मालती उमेश साबळे
0 Comments