पुणे - नाशिक येथे,तळा शेतकरी वर्गांची कार्यशाळा उत्पादक कंपनीचा पुढाकार
माय मराठी न्युज : कृष्णा भोसले
तळा : २६ मार्च,
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत तळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा राज्य अंतर्गत शेतकरी वर्गांची कार्यशाळा पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध शेतकरी यांच्यासाठी उत्पादक कंपन्या व कृषी विज्ञान केंद्र पाहण्यासाठी २५ ते २७ रोजी आयोजित करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणासाठी तळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभागी पहावयांस मिळाला.शेतीमध्ये अमुलाग्र बदल घडवून अधिक उत्पन्न मिळावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यांत आले.
सदर अभ्यास दौऱ्यामध्ये शेतकरी भाजीपाला प्रक्रिया, युनिट किसान मॉल, माऊली शेतकरी उत्पादक कंपनी, ग्लोबल शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनी नारायणगाव, शाश्वत फाउंडेशन फाउंडेशन नारायणगाव, अशोका फूड प्रोसेसिंग युनिट त्रंबकेश्वर, राईस मिल त्रंबकेश्वर, जिल्हा परिषद शाळा हिवाळी, सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनी नाशिक, कृषी विज्ञान केंद्र नाशिक, हनीबी व्हिलेज पिंपळगाव बसवंत ,गायत्री नर्सरी निफाड इत्यादी ठिकाणी भेटी देणार आहे या उपक्रमामुळे तळा तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी यांना शेती विषयक विविध प्रकल्प तयार करण्यासाठी तयार करण्यासाठी मदत होणार आहे.
उपविभागीय कृषी अधिकारी माणगांव - शुभम बोऱ्हाडे, तालुका कृषी अधिकारी- आनंद कांबळे तसेच कृषी अधिकारी- विजय तुपसोंदर्य यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखव सुरुवात सुरुवात करण्यात आली.यावेळी कृषी सहाय्यक अतुल बाबर, आत्माचे सचिन लोखंडे, कृषी सहाय्यक योगेश कोळी उपस्थित होते.
0 Comments