वेणु वाद्यातून निघालेला ध्वनी नादब्रम्ह आहे : ह.भ.प. रामदास भाई महाराज पाटील
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगांव : २९ मार्च,
जिवनात संगीत क्षेत्राला खूप महत्व आहे.त्याच बरोबर वारकरी संप्रदायात संगीतामध्ये मृदुंग,ताल,लय,असे वाद्याचे प्रकार पडत आहेत.आपण वाजवित असलेल्या वाद्याला चामडे लावलेले असते.मात्र ,हे सांधु संताच्या संपर्कात आल्यास त्यांचे भाग्य बदलत असते.पकवाद हा भारतीय संगीत मध्ये अनेक वाद्य असून,वेणू वाद्यामधून निघालेला ध्वनी नाद ब्रम्ह आहे.मत ह.भ.प.रामदास भाई महाराज पाटील यांनी काल्यांच्या किर्तनात माजगांव येथे म्हटले.
माजगांव येथे गेली आठ दिवस भजन,कीर्तन,प्रवचन या अखंड हरिनाम सप्ताह आयोजन चे ३७ वर्ष ग्रामस्थ,वारकरी,महिला मंडळ यांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत.काल दीपोत्सवांचे करण्यात आले यावेळी सुत्रसंचालन लायन क्लब चे किशोर पाटील ह्यांने केले. सरपंच, उप सरपंच सदस्य यांच्या उपस्थित,गुरुवर्य शांतीब्रम्ह धर्माचार्य राष्ट्रभूषण,रायगड भूषण ह.भ.प.मारुती (दादा ) महाराज राणे कर्जत( हलीवली ) आणी ह.भ.प.मधुकर महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु होते.आज या सप्ताहाची सांगता काल्यांच्या किर्तनांतून करण्यात आली.काल्याचे किर्तन सौजन्य सुर्याजी पाटील,तसेच काल्याचा महाप्रसाद भगवान काठावले,रवि काठावले यांच्या माध्यमातून देण्यांत आले.
यावेळी भाई महाराज पुढे म्हणाले की वेणू नी स्वताला छिद्रे पाडून घेतल्यामुळे त्यामधून सुंदर असे ध्वनी निघत आहे.पकवाद हा चर्म वाद्य असून या मधून निघणारा ध्वनी आहात नाद्य म्हटले जाते.विना हे तंतोवाद्य आहे.जसे संगीता मध्ये अनेक नाद असतात तसेच मानवी अवयवाची क्रिया वेगवेगळी असतात. प्रत्येकांनी जिवनात श्री कृष्णाचे चरित्र वाचावे,कालीया डोह शुद्ध केला तसेच जिवनात पाण्याला खूप महत्व श्री कृष्णाने गोवर्धनांची पुजा करुन पर्यावरण वाचविण्यांचा संदेश दिला होता.आज पर्यावरणांचा -हास होत चालला आहे. श्री कृष्णां जंगलात असतांना बासुरीने गाई अकर्षित होत होत्या कारण त्यांचा ध्वनी अनेक मैला पर्यंत जात होते.त्याच प्रमाणे गावातील दोष घालविण्यांसाठी भगवंताचा नाद होणे महत्वाचे आहे कारण अनेक मैल वातावरण शुद्ध होते.
आज गुरुकुल ची संख्या घटली आहे. ब्रिटिशाने ते बंद पाडले,आणी त्यांची शिक्षण पद्धत आमलात आनली,शिक्षण महत्वाचे आहे.मात्र आई वडीलांना विसरुन परदेशात राहिल्यास त्या शिक्षणांना काय अर्थ आहे.सोनं आपली कांती चमकविते.त्याच बरोबर त्वचा रोग नाहिसे करते.माणूस शांत बसतो मात्र पक्षी नाही तो चंचल आहे.असे मत काल्यांच्या किर्तनात व्यक्त केले.
0 Comments