नविन वर्षातील सण उत्सव शांततेत पार पाडण्यांचे : उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे अवाहन

 नविन वर्षातील सण उत्सव शांततेत पार पाडण्यांचे : उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांचे अवाहन 




माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापुर : २६ मार्च,
 
             नविन वर्षामध्ये गुढीपाडवा, रमजान ईद, महावीर जयंती, श्रीराम नवमी,हनुमान जयंती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती,हे सर्व कार्यक्रम शांततेने पार पाडण्याचे दृष्टीने खालापूर पोलीस ठाणे येथे शांतता मोहल्ला कमिटी पोलीस पाटील यांची एकत्रित बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर विक्रम कदम यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस निरीक्षक, खालापूर सचिन पवार,पोलीस निरीक्षक - संतोष आवटी यांच्या उपस्थितीत पार पडली. 
              बैठकीमध्ये शांतता मोहल्ला कमिटी कडून कोणत्या प्रकारे काम केलं पाहिजे तसेच  सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या आक्षेपार्ह  मेसेजला कशाप्रकारे आळा घालता येईल व त्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन विक्रम कदम यांनी केले. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राहण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घेणे व व सूचना देण्यांत आल्या.
           यावेळी धार्मिक जातीय तेढ निर्माण करणाऱ्या, जातीय सलोखा हानी पोहोचवणाऱ्या, राष्ट्रीय एकात्मतेला बाधा पोहचविणाऱ्या, एखाद्या विशिष्ट समाजाला भडकविणाऱ्या कोणत्याही पोस्ट, संदेश सोशल मीडिया द्वारे पोस्ट करू नका किंवा अशा प्राप्त झालेल्या पोस्ट शेअर करू नका.समाजामध्ये अफवा पसरू नये किंवा अफवावर विश्वास देखील ठेवू नये.जातीय सलोखा बिघडेल असे कोणतेही कृत्य करु  नये.कोणत्याही धर्माच्या व्यक्तीच्या व्यक्तिगत किंवा सार्वजनिक भावना दुखावतील अशा प्रकारे स्टेटस किंवा पोस्ट सोशल मीडियावर शेअर करू नये किंवा व्हायरल करू नये. असे अवाहन यावेळी पोलीस ठाणे च्या माध्यमातून शांताता कमिटी यांस करण्यांस आले.
  

Post a Comment

0 Comments

क्रिकेट महोत्सवात,असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश