जांभिवली शाळेत वार्षिक संमेलन उत्साहात संपन्न

 जांभिवली शाळेत  वार्षिक  संमेलन उत्साहात संपन्न



माय मराठी न्युज :  दत्तात्रय शेडगे 
खोपोली : ३० मार्च,

                  खालापुर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी  विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच त्यांच्या असणाऱ्या सुप्त गुणांची दखल घेऊन या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.
           कार्यक्रमात इतिहास आणि आधुनिक संस्कृतीचे दर्शन घडविणारी लोकगीते, तसेच स्वच्छतेचा संदेश देणारे पथनाट्य व नृत्यदिग्दर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप व उपशिक्षिका संध्या लोणकर यांनी केले.शिक्षणप्रेमी अण्णा गावडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ व नॅपकिन भेट दिले तसेच नंदकुमार गावडे  यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यांत आला. त्याच बरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गायकर यांनी साठी साऊंड सिस्टिम व स्टेज मोफत दिले.
           यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गायकर, देवराव मुंढे,आण्णा गावडे,दशरथ गावडे, कृष्णा गावडे, संदिप गावडे,राजु दुर्गे यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष सर्व सभासद पालक वर्ग यांचे स्वागत करण्यात आले.केंद्रस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धेतील यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती कडुन सत्कार करण्यात आला.
           सदर कार्यक्रमासाठी मालती गावडे, कोमल गावडे, पूजा गावडे, दीपिका मुंढे दीपिका घरत,सुजाता गावडे, ज्योती गावडे, निधी गावडे, सारिका गावडे, शुभांगी गावडे शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप, उपशिक्षिका संध्या लोणकर यांच्यासह   ग्राम पंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य,   पालक व गावातील ग्रामस्थ  उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप यांनी केले तर आभार उपशिक्षिका संध्या लोणकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

तळवली दांड वाडीतील घरांचे मोठे नुकसान,चक्री वादळामुळे बत्ती गुल,