स्मृती चषकाचा ,मानकरी ठरले स्वर्गीय प्रतीक इलेव्हन कराडे संघ ,तर द्वितीय क्रमांक माडपाई - माडप संघ
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
माजगाव : १ एप्रिल
स्मृती चषकांच्या माध्यमातून माजगाव,आंबिवली,वारद पौद,यांच्या वतीने नाईट क्रिकेट सामन्यांचे आयोजन पीपीएल कंपनीच्या समोर असलेले सोमाणी शेठ मैदान येथे घेण्यांत आले.या स्पर्धेत या परिसरातील ३२ नामवंत संघांनी सहभाग नोंदविला,अतितटीच्या सामन्यात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले स्वर्गीय प्रतीक इलेव्हन कराडे संघ, द्बितीय क्रमांक माडपाई - माडप संघ, तृतीय क्रमांक क्रिष्टा इलेव्हन आई गावदेवी खरसुंडी, चतुर्थ क्रमांक जय हनुमान वानिवली संघानी पटकाविले.
ह्या सामन्यात अंतिम विजेत्यास म्हणजे प्रथम क्रमांकास १, लाख रुपये,द्वितीय क्रमांक ५०, हजार तर तृतीया क्रमांक २५ हजार तर चतुर्थ क्रमांकास २५ हजार रुपये,या स्पर्धेचा अंतिम सामन्यात माडपाई - माडप संघाचा पराभव करून स्वर्गीय प्रतीक इलेव्हन कराडे संघ, संघाने प्रथम क्रमांक पटकावले.विजेत्या संघास आकर्षक चषक,देण्यांत आले.तसेच उत्कृष्ट फलंदाज- माडप अक्षय नाईक ,गोलंदाज - वनिवली वैभव थोरवे यांस कुलर व ट्रॉफी देण्यांत आली.उत्कृष्ट क्षेत्ररक्षक खरसुंडी मनीष बारस्कर ट्रॉफी आणि शूज,मालिकावीर कराडे - यश मोरे यांस सायकल देण्यांत आली.
या क्रिकेट सामन्यांचे समावोलोचन प्रकाश पाटील,अशोक मालकर यश मालकर,सुरज हातमोडे,ज्ञानेश्वर पारिंगे यांनी केले.गेले चार दिवस नाईट सुरु होते.ह्या स्मृती चषक सामान्यांचे थेट प्रक्षपण व क्रिडा प्रेमी यांस घर बसल्या पाहता यावे या उद्दात विचारांतून( युट्युब ) सुविधा करण्यांत आली होती.
या सामन्यांचे आयोजन मा.सरपंच रुपेश जाधव, सदस्य - शशिकांत पाटील, मंगेश लभडे,अमित पाटील, राजेश जाधव, अनिल जाधव, संदीप ढवाळकर आकेश लभडे,धनंजय जाधव, मच्छिन्द्र जाधव, बाजीराव ढवाळकर, साहिल शिंदे,संदेश जाधव सुशांत शिंदे, संदेश बडेकर,संजय ढवाळकर,रमाकांत पाटील,जयेंद्र पाटील,रतिश जाधव, प्रकाश जाधव तसेच या परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
0 Comments