सोशल मीडियाच्या माध्यमातून ३१ वर्षांनी शालेय जीवनातील मित्र एकवटले, शालेय जीवनातील आठवणींना मित्रांनी दिला उजाळा
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खोपोली : ३ एप्रिल,
खालापूर तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिर खालापूर येथील १९९३ ते १९९४ या सालातील दहावीमध्ये शिक्षण घेणारे मित्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ३१ वर्षांनी २ एप्रिल रोजी एकत्र येत जीवनाच्या वाटचालीचा लेख जोखा मांडत असताना शालेय जीवनातील आठवनींनी उजाळा दिला. तर यावेळी शिक्षणाचे धडे गिरविणारे शिक्षक वर्ग या स्नेहमेळाव्याने भारावून गेले होते. यावेळी आलेल्या मैत्रिणींचा सन्मान ही करण्यात आल्याने या स्नेह मेळाव्यात अधिकच अबोला पहावयास मिळाला.
स्नेहमेळावा संपन्न होण्याआधी सर्व मित्र-मैत्रिणींनी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेला भेट देत शिक्षकांचा सन्मान करत पुढील काळात शाळेला मदत करण्याचे आश्वासन दिले असून यावेळी शिक्षक प्रदीप थोरावडे, प्रमिला पवार तसेच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मुख्याध्यापक एस आर पाटील ,राणे सर मिरकुटे सर ,माने सर सर ,थोरावडे मॅडम व कर्मचारी मारुती पवार तसेच म्हस्के साहेब, महादेव ठोबरे आदी उपस्थित होते. तर यावेळी नीता पाटील खरे , आशा दिघे म्हस्के, पदमजा पिंगळे ठोबरे, रजनी गायकवाड पवार ,संजीवनी पिंगळे विलास शिंदे, उद्धव लोते,
नितीन चोगले, संतोष साळुंखे, अहमद शेख, विजय शिंदे, अनिल पिंगले, प्रशांत गोपाळे, एकनाथ मिसाळ, मच्छिंद्र पारंगे, मंगेश चाळके, रवींद्र कदम, सुरेश बांगरे,छगन मिसाळ, गुरुनाथ घोसाळकर, दिपक हाडप, मनोहर हाडप, दिनेश पडवकर, हरिचंद्र वाघमारे , संदीप वादळ, सुधीर पारंगे, संभाजी पाटील, रोहिदास पाटील, वासुदेव पाटील, हरिश्चंद्र वाघमारे, अतुल केतकर संतोष कांबळे, भरत पाटील, वसंत मोरे, विलास पिंगळे, सुहास बारड, मनोज गोरे,मनोहर घोसाळकर, शुभाष पाटील,रवींद्र फराट, विश्वास पाटील ,किशोर लोते
आदी मित्र मैत्रिणी ३१ वर्षांनी एकत्र आले होते. जुने मित्र मैत्रिणी, त्यांच्यासोबत शिकत असताना घडलेले गमतीदार किस्से, शिक्षण घेत असताना काढलेल्या एकमेकांच्या खोड्या, झालेली भांडणे रुसवे, फुगवे या साऱ्या आठवणीत "ते’ रमले. निमित्त होते, नढाळ येथे घेण्यात आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचे.
तब्बल ३१ वर्षांनंतर सर्व वर्गमित्र परत एकाच मंचावर आले होते. धकाधकीच्या जीवनातून १९९३ - १९९४ बॅचच्या काही माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून स्नेहमेळावा घेतला, त्यासाठी त्यावेळचे सर्व वर्गमित्र व शिक्षकांना आमंत्रित करण्यात आले होते, या स्नेहमेळाव्याने मित्र व मैत्रिणी मधील मैत्रीचा धागा अधिकच मजबूत झाल्याचे त्यांच्या दिवसभरातील घडामोडीवरून दिसून आले.
0 Comments