इंदरदेव धनगरवाडातील जळीत कुटूंबाना तात्काळ मदत द्या - जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी

 इंदरदेव धनगरवाडातील जळीत कुटूंबाना तात्काळ मदत द्या - जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १७ मार्च,

         रोहा तालुक्यातील इंदरदेव धनगरवाडा  येथे वणव्यात ४८  घरे जळून खाक झाली असून त्या कुटूंबाना तात्काळ मदत मिळवून द्या यासाठी आज जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडने जिल्हाधिकारी किसन जावळे यांना निवेदन दिले आहे.
          इंदरदेव येथील डोंगरावर धनगर समाजाची ४८  घरे असून येथील डोंगराला प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागली असून या आगीत येथील संपूर्ण घरे जळून खाक झाली आहेत,या घरांचा तात्काळ फेर पंचनामा करून बेघर कुटूंबाना मदत मिळावी यासाठी आज जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्था रायगडच्या वतीने जिल्हाधिकारी किसन जावळे यांना निवेदन देण्यात आले.
         तर या निवेदनात या कुटूंबाना तात्काळ मदत करून शासनाने त्यांना त्या ठिकाणी घरे बांधून द्यावीत, आणि त्यांना तेथे रस्ता पाणी, प्राथमिक आरोग्य केंद्र, आदिसह दळणवळनाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्या यासाठी निवेदन देण्यात आले.यावेळी जय मल्हार धनगर समाज सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष रामभाऊ  केंडे,  सचिव राजू आखाडे, सहसचिव राया ढेबे, सदस्य चंद्रकांत केंडे, धावू आखाडे, रवी बोडेकर, लक्ष्मण मरगळा,आदिसह अनेक समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

विक्रम गायकवाड यांच्या अभिष्ठचिंतनास प्रितम म्हात्रे यांची उपस्थिती,भावी सरपंच म्हणून कार्यकर्ते यांची ललकारी