आदर्श शिक्षक पुरस्काराने मुख्याध्यापक मच्छिंद्र खेमनर सन्मानित
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १७ मार्च,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटनेच्या वतीने मुख्याध्यापक मच्छिंद्र रावसाहेब खेमनर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
दरवर्षी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती संघटना शाखा रायगड यांच्या वतीने आदर्श शिक्षक, गुणवंत पुरस्कार आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा २०२४ /२५ चा आदर्श पुरस्कार देण्यात आला.
यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार आत्करगाव शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र रावसाहेब खेमनर यांना देण्यात आला. हा पुरस्कार आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी राज्य उपाध्यक्ष विनोद कडव सर, जिल्हाध्यक्ष दिपक पाटील सर ,खालापूर तालूकाध्यक्ष सुरेश चव्हाण सर, आदिसह अनेक शिक्षक आणि मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.
0 Comments