सारंग गावचे सेवानिवृत्त लिपिक वै.ह.भ.प.राजाराम देशमुख यांचे वृद्धापकाळाने निधन
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : १८ मार्च,
खालापूर तालुक्यातील सारंग गावचे रहिवाशी असलेले वै.ह.भ. प. राजाराम नामदेव देशमुख, यांचे वयाच्या ८१ वर्षी सोमवार दि. १० मार्च २०२५ रोजी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,वारकरी आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.
वै.ह. भ. प.राजाराम देशमुख हे खालापूर तालुक्यातील टेंभरी ग्रामपंचायत मध्ये लिपिक पदावरून २००६ ला सेवानिवृत्त झाले होते.जवळपास ३५ वर्षे त्यांनी ग्रामपंचायत मध्ये सेवा केली. एक लिपिक म्हणून त्यांनी आपलं उत्कृष्ट योगदान केले.
त्यांचे दशक्रिया विधी बुधवार १९ मार्च रोजी श्री क्षेत्र उद्धर रामेश्वर सुधागड पाली तर उत्तरकार्य शनिवार २२ मार्च रोजी सारंग येथे त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प. द्वारकानाथ महाराज देशमुख (इंजिवली) यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणारा आहे.तसेच शुक्रवार २१ मार्च रोजी रात्री ०७ ते ०९ कीर्तन ह. भ. प. पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी) यांचे होईल व रात्री १० वाजता जागर भजन होणार आहे.
त्यांच्या पश्चात मुलगा यशवंत देशमुख,सुनिल देशमुख, दिनेश देशमुख,तसेच नरेंद्र देशमुख, दत्तात्रेय देशमुख,बळीराम देशमुख, संचित देशमुख,वसंत देशमुख,भाऊ बहिणी,सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.
0 Comments