बीड पेक्षा वाईट अवस्था कर्जतची दहा दिवस थांबा पुराव्यासह पोलखोल करणार - सुधाकर घारे

 बीड पेक्षा वाईट अवस्था कर्जतची दहा दिवस थांबा पुराव्यासह पोलखोल करणार  - सुधाकर घारे 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
कर्जत : ८ मार्च,

          बीड आणि बिहारलाही लाजवेल असा आका कर्जत खालापूरत असून त्यांस लवकरच जेल मध्ये जाणार अशी कठोर टीका घारे यांनी केली.बीड पेक्षा वाईट परिस्थिती सध्या कर्जत खालापूर असून येणाऱ्या काही दिवसात आम्ही पोलखोल करून तुम्हाला जेल मध्ये टाकल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा परिवर्तन विकास आघाडीचे नेते सुधाकर यांनी आमदार महेंद्र महेंद्र थोरवे यांचे नाव न घेता टीकेचे अस्त्र सोडले.
              विधानसभा निवडणुकीपूर्वी थोरवे विरुद्ध घारे अशा संघर्षाला पुन्हा नवीन धार मिळाली असून  सुधाकर घारे यांनी शुक्रवारी कर्जतमध्ये पत्रकार परिषद घेत फक्त १० दिवस थांबा, कोणाकडे किती जमीन आहे, किती जागा खरेदी केली, पोलीस अधिकाऱ्यांच्या कशा बदल्या केल्या हे सर्व पुराव्यानिशी सादर करणार असल्यांचे त्यांनी सांगितले.लोकांवर कसे अन्याय केले, कुणाला दमदाटी केली , कुणाला फोन केले याची माहिती घेतली आहे. याचे पुरावे मी लवकरच तुम्हाला देईन.तसेच  सुनिल तटकरे यांच्यावर टीका करण्याची तुमची उंची नाही, असेही घारे यांनी सुनावले आहे. 
           यावेळी ते पुढे म्हणाले की आमदार महेंद्र थोरवे यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास माहित नसून चुकीचा इतिहास येथील तरुणांना सांगून त्यांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचे  विधानसभेतुन निलंबन करावे अशी मागणी आज पत्रकार परिषदेत सुधाकर घारे यांनी केला आहे,




Post a Comment

0 Comments

दत्तात्रेय रामचंद्र काठावले यांचे अल्पशा आजाराने निधन