वनव्यात होरपळलेल्या झाडांना पर्यावरण प्रेमींनी दिली नवसंजीवनी
खोपोलीच्या मॉर्निंग स्टार ग्रुपचा अनोखा उपक्रम
माय मराठी न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : ६ मार्च,
खोपोली नगरपालिकेच्या माध्यमातून शेडवली उपनगरात असलेल्या माळरानावर जुलै २०२४ मध्ये मियावाकी गार्डनची निर्मिती करून एक नवा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून हजारो झाडांची लागवड करण्यांत आल्यामुळे,या झाडांचे संगोपन आणि संवर्धन केले जात होते.दुर्दैवाने शेडवली परिसरात लागलेल्या वनव्यांमुळे वाढ झालेली बहुतांशी झाडे होरपळून गेली.पहाटे मॉर्निंग वॉक साठी मॉर्निंग स्टार ग्रुपच्या सदस्यांच्या ही बाब लक्षात आली.त्यांनी लागलीच होरपळलेल्या मियावाकी गार्डनला पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्यामुळे झाडांना नवसंजीवनी निर्माण झाली आहे.
या ठिकाणी नगरपालिकेने विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यांत आली होती. त्याच सोबत ठिबक सिंचन पद्धतीने झाडांना माफक पाणी देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली होती. मात्र वनवा लागल्यामुळे ठिबक सिंचन यंत्रणादेखील जळून खाक झाली होती मात्र दररोज सकाळी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन अंग मेहनत करत प्रत्येक झाडाला पाणी देण्यांचा नित्यक्रम उपक्रम सुरू केला.यामुळे हळूहळू त्यांच्या प्रयत्नाला यश येताना दिसले व होरपळलेल्या झाडांना नवी पालवी फुटू लागली.
खोपोली नगरपालिकेने सुरू केलेल्या या उपक्रमाचा लाभ खऱ्या अर्थाने पर्यावरणाला होणार असल्याने वनव्याने खाक झालेल्या मियावाकी गार्डनला पुनर्जीवित करण्याची जबाबदारी स्वीकारून मॉर्निंग स्टार ग्रुपने केलेल्या प्रयत्नांचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी डॉ.अभिमन्यू चंदनशिवे,अमोल ठकेकर,दिनेश ओसवाल यांचे कौतुक केले.
.jpg)
0 Comments