आपटी शिव मंदिर येथे भाजप महिला वर्गाकडून स्वच्छताअभियान,
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २६ मे,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तिनशे व्या जयंती निमित्ताने भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका यांच्या वतीने २५ मे ते ३१ मे या कालावधीत सामाजिक पर्व म्हणून विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत खालापूर तालुका महीला मोर्चा यांच्या वतीने आपटी येथील शिवमंदिरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
या अभियानात भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई दळवी , निकीताई हेलंडे सचिव-रायगड जिल्हा , श्वेताताई मनवे माजी ग्रामपंचायत सदस्या,दिपाली शिर्के उप सरपंच वावोशी ग्रामपंचायत ,पुनम भऊड सदस्या ग्राम पंचायत वावोशी,ज्योती मोरे मा.सरपंच आपटी ग्रामपंचायत ,अनिता मोरे,चैताली लफडे,रसिका जंगम,शितल जंगम,राजश्री दळवी,निलम दळवी,वनीता जंगम,विकास सांवत बुथ अध्यक्ष तांबटी,जयेंद्र पाटील
बुथ अध्यक्ष नारंगी आदि पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 Comments