सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक - सुभाष म्हात्रे,यांस पोलीस महासंचालक पदक देवून सन्मानित
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
खालापूर : ३ मे,
खालापूर पोलीस ठाणे येथे कर्तव्यदक्ष असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष म्हात्रे यांच्या उल्लेखनिय कामाची दखल घेत त्यांस आलिबाग पोलीस ग्राउंड येथे ना.अदितीताई तटकरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालक पदक देवून सन्मानित करण्यांत आले.
पोलीस खात्यात काम करीत असतांना त्यांनी आपल्या बुद्धी चातुर्याचा उपयोग करुन गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या,या मध्ये त्यांचे मोठे योगदान आहे.विविध प्रकारे गुन्हे उघडकीस आणले,त्यांच्या या कामाची दखल घेवून हे पदक बहाल करण्यांत आले.तसेच रायगड पोलीस कबड्डी संघामध्ये देखील बरीच वर्षे उल्लेखनीय कामगिरी केल्यांचे समजते.
पोलीस ठाण्यांत प्रत्येकांस सन्मान वागणूक देवून सामाजिक, जातीय, व राजकीय समस्या हाताळण्यामध्ये त्यांचा जवळ कसब असल्यांचे बोलले जाते.गेली अनेक वर्ष पोलीस खात्यात काम करीत असतांना आजवर पाली,रसायनी तसेच आता खालापूर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे.त्याच बरोबर त्यांचा जनसंपर्क उत्तम असून त्यांनी केलेले कार्य उल्लेखनिय असल्यांचे प्रतिपादन पोलीस महासंचालक पदक प्रदान करतांना आपल्या मनोगतात उपस्थित पोलीस अधिकारी यांनी व्यक्त केले.

0 Comments