पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे आयोजन, ३०० महिलांसह अहिल्या रत्नांचा होणार सन्मान....

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीचे आयोजन,

३०० महिलांसह अहिल्या  रत्नांचा होणार सन्मान....

माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २९ मे,



          राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव शेलू रायगड, क्षत्रिय धनगर समाज कर्जत, आणि सातारा जिल्हा रहिवासी संघ शेलू यांच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३००  व्या जयंतीचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. असून हा जयंती सोहळा रविवार १  जून २०२५ रोजी शिवसृष्टी  पार्क सोसायटी शेलू ( नेरळ) येथे आयोजित करण्यात येणार आहे.
           राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती असल्याने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य कारण्याऱ्या ३०० महिलांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तर समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अहिल्या रत्नाचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.तर दुपारी १ वाजता ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, आणि माणुसकी प्रतिष्ठान डॉ. राजाराम हुलवान आणि सिव्हिल हॉस्पिटल आणि उज्वला भविज्य सामाजिक संस्था यांच्या वतीने  गोर गरीब नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि मोफत औषधे वाटप,सायंकाळी ५  ते ७ संयुक्त मिरवणूक, ७ वाजता प्रतिमांचे पूजन, ८ वाजता मान्यवरांचा आणि दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार,आणि ३०० महिलांचा विशेष सत्कार, ८: ३०  वाजता व्याख्याते बाबासाहेब कोकरे यांचे व्याख्यान, रात्री ९ वाजता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
              तरी या जयंती सोहळ्याला सर्व समाज बांधव आणि अहिल्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन  राजामाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक  तथा माजी अध्यक्ष  रामचंद्र (आप्पा ) पुकळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर