ग्रुप ग्राम पंचायत नावंढे यांनी घेतलेल्या निर्णयांची तालुक्यात चर्चा,घेतलेला निर्णय कौतुकास्पद
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
नावंढे : २ जून,
आज पर्यावरणांचा होत चालेला -हास आणी मराठी शाळेला पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ या दोन्ही विषयावर ग्रुप ग्राम पंचायत नावंढे या विषयावर सभा आयोजित करण्यांत आली.विशेष म्हणजे तहकूब झालेली ग्रामसभा नुकताच घेण्यांत आली.यावेळी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले.या मध्ये नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील जो पालक आपल्या मुलाला रायगड जिल्हा परिषद शाळेत टाकेल त्यांची या वर्षी पासून घरपट्टी माफ करण्यांचा निर्णय घेण्यात आला.तसेच जो कुटुंब पाच झाडे लागवड करुन त्यांचे संवर्धन करेल त्या महिलेस पैठणी,पुरुषास शर्ट पॅंट ,व जिओ ट्रॅकिंग कडून सन्मानित करण्यांत येईल असा निर्णय एक मताने घेण्यांत आला.
आज विविध प्रकारच्या खाजगी शाळा निर्माण होत असतांना त्यातच सीबीसीबी बोर्ड मुळे पालकांचा कल आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये दाखल करीत आहेत.यामुळे मराठी शाळेचे अस्तित्व धोक्यात येत चालले आहे.मुलांना मराठी शाळेत दाखल केल्यास त्या शाळेला पुन्हा दिवस उत्तम येईल,तसेच पर्यावरणांचा समतोल अबाधित राहावे या विचारांतून वृक्ष लागवड व संवर्धन हा कार्यक्रम हाती घेवून एक पाउल ग्राम पंचायतीने पुढे टाकले आहे.
ही ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ प्रकाश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपत्र झाली. यावेळी ग्रामसेवक पाटोळे, ग्रामस्थ किरण हाडप शेखर हाडप पप्पू हाडप, ज्योती पिंगळे यांच्यासह नावंडे घोडीवली, कांडरोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत.हा ऐतिहासिक निर्णय घेण्यांत आला.
------------ चौकट ----------
गावातील जि.प.शाळा टिकविण्यासाठी प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांची घरपट्टी माफ करण्याची सुचना ग्रामसभेत मांडली,तसेच पर्यावरणांचा समतोल अबाधित रहावे यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन बक्षिस व सन्मान हा निर्णय सर्वांनी एकमताने मंजुरी दिल्याचद्दल सर्वांचे आभार.
ग्रामस्थ नावंढे - किरण हाडप
0 Comments