सावरोलीतील के.डी.एल.बायोटेक कंपनीतील कामगारांची देणी मिळविण्यासाठी आक्रोश

 सावरोलीतील  के.डी.एल.बायोटेक कंपनीतील कामगारांची देणी मिळविण्यासाठी आक्रोश,

आमदार थोरवेंचे भाचे संकेत भासेंनी विकत घेतलेल्या कंपनीतील प्रकार




 माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
सावरोली  : २ जुलै,
 
             खालापूर तालुक्यातील सावरोली गावा नजिक  असलेला प्रजीविकेचे उत्पादन करणाऱ्या के.डी.एल बायोटेक कंपनी  २०१३  पासून बंद असून एकूण ७००  कामगारांवर उपासमारीची वेळ असताना कामगार आपली हिशोबाची देणी मिळविण्यासाठी न्यायालयीन लढा देत आहेत.मात्र ही जागा एलएनटी  कंपनीला विकली असल्याची माहिती कामगारांना समजल्यावर कामगार आक्रमक झाले असून बुधवारी कंपनीच्या गेटसमोर कामगारांनी शांततेच्या मार्गाने पत्रकार परिषद घेऊन माहिती सदर माहिती पत्रकार यांस सांगितली.
            आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत जनार्धन भासे व त्यांचे सहकारी परेश नंदलाल शेट,रोशन प्रदीप शहा यांनी कवडीमोल भावत  जमीन खरेदी केली होती.विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान भासे यांनी कामगारांची देणी मिळविण्यासाठी मदत करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र कामगारांच कसलाही विचार न करता कंपनीची खरेदी केलेली जागा एलएनटी  कंपनीला विकण्यांत आली.
         १९८८ सुरु झालेला कारखाना २०१३ मध्ये पडला.या कारखान्यात कायमस्वरूपी २१४ कामगार  व अन्य  ठेकेदारी पध्दतीवर जवळपास ७०० कामगार कार्यरत होते.या कामगारांच्या जीवावरच त्यांचे कुटुंब अवलंबून होते कारखाना बंद पडल्यानंतर या कामगारांचे हिशोब मिळावा यासाठी व्यवस्थापन यांच्याबरोबर चर्चा सुरू असताना अश्वासना खेरीज गेले १२ वर्षात एक फुटकी कवडी  सुद्धा मिळालेली नाही. सदरचा कारखाना हा आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत जनार्धन भासे सहकारी परेश नंदलाल शेट,रोशन प्रदीप शहा यांनी अंदाजे ७२ कोटीची कंपनी २२  ते २४  कोटी रूपयात खरेदी केली. 
                 कामगारांनी देणी मिळवून देण्यासाठी संकेत भासे यांच्याकडे विनवणी केली. दोन महिन्यात कामगारांची देणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो. तुम्ही निवडणूक काळात आ.थोरवे यांच्याविषयी चुकीची माहिती नको जायला अशी विनंती संकेत भासे यांनी कामगारांना केली.निवडणुकीनंतर भासे आणि त्यांचे सहकारी पार्टनर यांनी एकदाही कामगारांशी संपर्क केला नाही.उलट कंपनी एल.एन.टी लार्सन अँड टूब्रो कंपनीला चारपट भावाने विकून कामगारांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप कामगार प्रतिनिधी प्रशांत गोपाळे यांनी केला आहे.
         कंपनी मालकाने कंपनीवर कर्ज घेवून इतर प्राँपर्टी केली.कर्ज मात्र आमच्या कंपनीवर राहिला.त्यानंतर दहशत माजवत कंपनीतील मशनरी इतर ठिकाणी घेवून गेला.कंपनी बंदमुळे स्थानिक भूमिपुत्रांवर उपासमारीची वेळ आली.कामगारांनी न्यायालयीन लढा दिल्यावर न्यायालयाने समापक पत्र दिले त्यामध्ये देणी देण्याचे म्हटले परंतु मुदतीत देणी मिळाली नाही.उलट सदर कंपनीची ३६ एकर बाजारभावानूसार न विकाती कवडीमोल भावात आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे आणि पार्टनरांनी विकत घेतली.सदर जमीन कमी भावात घेतल्यामुळे जमीन जप्त होवू शकते म्हणूनच त्यांनी एल.एन.टी लार्सन अँड टूब्रो कंपनीला चारपट भावात विकली आणि मोबदला कमवला असून २१४ कामगारांचा विचार केला नसल्याचा आरोप संतोष केदारी यांनी करीत भविष्यात तिव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
               सन २०१३  पासून बंद आहे. कामगारांवर उपासमारीची वेळ आहे.अनेक कामगारांचा मृत्यु झाला तरीही कामगारांची देणी मिळत नसल्यामुळे कामगार सध्या आक्रमक झाले. देणी मिळविण्यासाठी यामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना बदनाम करण्याचा उद्देश नाही असे मत ज्येष्ठ कामगार गजानन बैलमारे यांनी बोलताना सांगितले.यावेळी कामगार संतोष केदारी गजानन बैलमारे,किशोर घोसाळकर, प्रशांत गोपाळे अनिल मोरसिंग दिलीप बारड,शैलेश बैलमारे, चंद्रकांत बैलमारे,अशोक पाटील सचिन पाटील, चणाराम मुआल,गुरुदत्त घोसाळकर,बाळासाहेब कदम,मनोहर कदम, सखाराम भेसरे,चंद्रकांत उजगावकर यांच्यासह बहुसंख्य कामगार उपस्थित होते.यावेळी आम्ही  मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे कामगारमंत्री यांची भेट घेऊन व्यथा मांडणार असल्याचे कामगारांनी माहिती कामगारांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments

सुकीवली जिल्हा परिषद गटातून प्रशांत आखाडे