चौक येथे विजेचा लपंडाव,विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान,भिंगारी येथे व्यथा मांडून अश्वासनांची खैरात, पदरी मात्र निराशा
चौक : ११ जुलै,
पाऊस येतो क्षणभर, मात्र लाईट जात असते दिवसभर असेच चित्र सध्या चौक येथे पहावयास मिळत आहे.सध्या येथे विजेचा लपंडाव पहावयास मिळत आहे.मात्र नागरिकांना अश्वासनांच्या खैरात शिवाय काहीही मिळत नाही ,या ठिकाणी सातत्याने लाईट जात असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी भिंगारी येथिल कार्यालयात जावून आपली व्यथा सादर केली.यावेळी उपस्थित नागरिकांना अश्वासन देण्यांत आली.मात्र १५ दिवसानंतर ही ग्रामस्थांच्या वरती वटाण्यांची अक्षदा फिरविल्या जात असल्यांचा आरोप ग्रामस्थांनी केला.
चौक ही बाजारपेठ असून सातत्याने गजबजेल्या स्थितीत पहावयास मिळत असते.या ठिकाणी या बाजारपेठेला अनेक गावे जोडली गेली असून सातत्याने या ठिकाणी नागरिकांची रेलचेल असते.मात्र या ठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरु असून व्यवसायिक पुरते हैराण झाले आहे.तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याच बरोबर पाण्यांचा प्रश्न गंभीर बनत आहे,पावसाळा जरी सुरु असला तरी सुद्धा हे सर्व उपकरण विजेवर चालत असल्यामुळे नियोजित वेळेवर पाणी मिळत नसल्यांची खंत येथिल नागरिक व्यक्त करीत आहे.
सदर या परिसरातील ग्रामस्थ भिंगारी येथे जावून आपल्या समस्या व्यक्त करीत असतांना त्या पुर्ण करण्यांचे अश्वासन मेन ईंजार्ज शिंदे यांनी पुर्ण करण्यांचे अश्वासन दिले.यावेळी पाताळगंगा येथून आलेली लाईन भोकर पाडा येथून देण्यात यावी ,कर्मचारी वाढविणे,तक्रारी साठी कर्मचारी नियुक्ती करणे,वाढिव बील चौक येथेच निरसन व्हावे,तक्रार केल्यानंतर त्यांचे तातडीने निरसण व्हावे,अदि मागणी साठी गणेश कदम,सुभाष पवार उप सरपंच - हर्षल हनुमंते व्यापारी अध्यक्ष - विजय ठोसर सामाजिक कार्यकर्ते - महेश पोळेकर अदि उपस्थितांना अश्वासन देण्यांत आले होते.
0 Comments