सेन्ट जोसेफ येथे वाहतुकीची कोंडी,रस्त्यामध्ये चिखल,विद्यार्थ्यांचा पाय घसरून शैक्षणिक साहित्याचे नुकसान
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : १५ जुलै,
लोधिवली जवळ असलेली सेन्ट जोसेफ ह्या शाळे जवळ पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल असून आता वाहतुकीच्या कोंडीची समस्या या ठिकाणी निर्माण होत असल्यांचे पहावयास मिळत आहे.यामुळे वहानांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी पहावयांस मिळत आहे.तसेच अनेक विद्यार्थ्यांना पायी पिट करत शाळेपर्यंत चालत जावे लागत आहे.त्यातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल असल्यामुळे पाय घसरुन विद्यार्थी पडत असून शैक्षणिक साहित्यांचे मोठे नुकसान होत आहे.
आजची मुले ही देशाचे अधार स्थंभ म्हणून ओळखले जात असतांना त्यांचा शाळेमध्ये जाण्यांचा प्रवास हा चिखल,मातीतून असून हे मोठे दुर्देव असल्यांचे बोलले जात असून या संदर्भात विद्यार्थी नाराजी व्यक्त करीत आहे.हा रस्ता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येत असून,या ठिकाणी दिवस भरातून अनेक वाहने या चिखलात अडकून सातत्याने अपघात घडत असल्यांचे निदर्शनास येत असल्यांचे पहावयास मिळत आहे.
मात्र या कडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यांचा आरोप विद्यार्थी व्यक्त करीत आहे.गेले अनेक दिवस पाउस पडत असल्यामुळे याच मार्गावर जल वाहिनी टाकण्यांचे काम सुरु असल्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणारे विद्यार्थी सह वयोवृद्ध,ग्रामस्थ,तसेच आजारी व्यक्ती साठी धोकादायक होत चालले आहे.या मार्गावरुन जात असतांना रस्त्यावर एक ते दिड फुटापर्यंत चिखल असल्यामुळे वहान या मध्ये अडकून पडत असून,विद्यार्थी सुद्धा यांचा सामना करावा लागत आहे परिणामी हा रस्ता वाहतुकीच्या कोंडी समवेत अपघाताचे केंद्रबिंदू बनत चालले आहे.
---------------- चौकट ----------------
लोधिवली येथिल असलेली सेन्ट जोसेफ ह्या शाळेत जाणा-या रस्त्याची अवस्था बिकट निर्माण झाल्यामुळे,विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून,वाहतुकीच्या कोंडीची समस्या निर्माण होत आहे.आपत्कालीन स्थितीत कोणतीही सेवा मिळण्यांस गंभीर समस्या निर्माण होणार आहेत.
सामाजिक कार्यकर्ते तथा मा. ग्रु. ग्रा. पं. सदस्य चौक : सतिष कृष्णा आंबवणे
0 Comments