चौक बाजार पेठेत विद्युत केबल तुटली,गणेश कदम च्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला

 चौक बाजार पेठेत विद्युत केबल तुटली,गणेश कदम च्या सतर्कमुळे मोठा अनर्थ टळला  



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
चौक  : १६ जुलै,

            चौक बाजार पेठेत एम एस ई बी ची असलेली विद्युत वाहक  केबल तुटल्यामुळे नागरिकांच्या मध्ये काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते.त्यातच पावसाळ्यांचे दिवस असल्यामुळे हा धोका गंभीर असतो.मात्र या ठिकाणी असलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांच्या सतर्कमुळे होणारा अपघात टळला त्यांनी तातडीने विज पुरवठा कार्यालयात संपर्क करुन विज पुरवठा खंडीत करण्यांत आला.
              नुकताच चौक येथिल विजेच्या लपंडाव,सुरु असून भिंगारी तसेच चौक येथिल कार्यालयात जावून  समस्यांचा पाढा वाचण्यांत आला.मात्र त्या वरती उपाय योजना,मात्र शुन्य झाली असल्यांचे समजते.या ठिकाणी विद्युत वाहक केबल जिर्ण झाल्यामुळे असा प्रकार घडत असल्यांचे येथिल नागरिकांचे म्हणणे आहे.
          चौक ही जुनी बाजार पेठ असल्यामुळे या ठिकाणी खरेदि करण्यांसाठी या परिसरातील शेकडो हून अधिक जण या ठिकाणी बाजार करण्यांसाठी येत असतात.परिणामी या ठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यांचे पहावयांस मिळत असल्यामुळे येथे असलेले जय हिंद स्टोअर समोर च्या समोर ही विद्युत वाहीनी तुटली असल्यामुळे काही काळ नागरिकांच्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.



          --------------चौकट ------------
पावसाळ्याच्या दिवसामध्ये दुपारी चालु विद्युत वाहीनी ची केबल तुटून पडल्यामुळे येथे गोंधळ निर्माण झाला होता.मी तातडीने एमएसईबी च्या कार्यालयात फोन लावून विज पुरवठा  खंडीत करावयास सांगितले यामुळे मोठा आनर्थ टळला 
         सामाजिक कार्यकर्ते चौक - गणेश कदम 


               
        --------------चौकट ------------
     सदर ही विद्युत वाहीनी चालु होती.मात्र नागरिकांच्या सतर्कमुळे आम्ही तातडीने विज पुरवठा खंडीत करुन आम्ही ती केबल बाजुला करण्यांत आली.
  एम एस ई बी शाखा अभियंता चौक - योगेश देसाई 

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर