आमदार महेश बालदि यांचा चौक येथे विकास कामाचा झंझावात
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : १७ जुलै,
चौक बाजार पेठ ही सातत्याने गजबजलेली आपणांस पहावयास मिळत असते.मात्र विकास च्या बाबतीत सौम्य असलेली ही चौक बाजार पेठ आज आमदार महेश बालदि यांच्या आमदार फंडातून विविध विकास कामे करुन मार्गी लावण्यांत आली.या बाजार पेठेच्या रस्त्याची दुरावस्था निर्माण झाल्यामुळे बाजार करण्यांसाठी आलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.मात्र येथिल पुर्ण रस्ता क्रॉक्रेटिकरण करण्यांत आल्यामुळे येथिल बाजार करण्यांसाठी येत असलेले नागरिक समाधान व्यक्त करीत आहे.
आमदार बालदि यांनी विकास कामे करण्यांत सतत अग्रेसर असून त्यांनी या परिसरातील असणारे विविध रस्ते उत्तम प्रकारे करुन येथिल ग्रामस्थांना दिलासा दिल्यांचे पहावयास मिळत आहे.त्याच बरोबर चौक गेटाची विहीरीकडे जाणारा रस्ता, ग्रुप ग्रामपंचायत कडे जाणारा रस्ता,असे मार्गाचे क्रॉक्रेटिकरण करण्यांत आले.गेले अनेक वर्ष चौक चा विकास रखडलेला होता.मात्र पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विकास कामाला जोर धरल्यांचे पहावयांस मिळत आहे.
ग्रामस्थांच्या समस्या आणी गावाचा विकास हाच ध्यास असल्यांचे आमदार सातत्यांने बोलत असून विकास कामावर ते जातीने लक्ष घालून,त्यांनी विकास कामाचा झपाटा सुरुच ठेवला आहे.त्याच बरोबर आजही या परिसरात विकास कामे रखडली असून त्यांचे टेंडर काढून पुर्ण केली जातील असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम यांनी प्रतिनिधीशी बोलतांना दिला यामुळे सर्व सामन्य नागरिक या केलेल्या विकास कामाबद्दल आमदाराचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.
0 Comments