शेकाप चे पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्ष विक्रम गायकवाड यांज कडून शैक्षणिक साहित्य वाटप
माय मराठी न्युज : वृत्तसेवा
चौक : २१ जुलै,
ग्रामीण भागात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांची स्थिती उत्तमच असते नाही.मात्र त्यांना शिक्षणांसाठी छोटाशी मदत व्हावी या उद्दात विचारांतून सामाजिक कारकर्ते तथा नुकताच त्यांची शेतकरी कामगार पक्ष खालापूर तालुका पुरोगामी युवक संघटना उपाध्यक्ष म्हाणून निवड झाली यांचे औचित्य साधत राजिप शाळा खैराट व वावंढल आश्या दोन्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांस शैक्षणिक साहित्य तसेच खावू वाटप करण्यांत आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर स्मित हास्य पहावयांस मिळाले.
विक्रम गायकवाड हे उद्योजक असून स्वताची
विकी एक्झोटिका नर्सरी असून ते सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय असून ते आई ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्ता, विभागीय उपाध्यक्ष,तसेच भावी सरपंच म्हणून त्यांच्या कडे पहिले जाते.आज वर त्यांनी विविध समाजिक कार्यात सहभाग नोंदविला असून त्यांच्या मध्ये असलेले गुण समाज्याच्या हितासाठी ठरत आहे.
यावेळी राजिप शाळा वावंढल मुख्याध्यापिका पाटील मॅडम, खैराट प्राथमिक शाळा मुख्याध्यापक संदीप सुर्वे, शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते - अनिल भउड,लक्ष्मण झोरे,तुकाराम झोरे ग्रामपंचायतचे सदस्य व शाळेतील शिक्षक विद्यार्थी या परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments