खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकुरवाडी रस्त्याची वाट बिकट,रस्ता नसल्यामुळे पायपीट
खालापूर तहसील कार्यालया समोर सामाजिक कार्यकर्त्यांसह आदिवासी बसणार उपोषणासा....
माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २१ जुलै,
खालापूर तालुक्यातील खानाव ग्राम पंचायत हद्दितील असलेली दुर्गम भागातील खडई धनगरवाडा आणि करंबेळी ठाकुरवाडी या रस्त्याला वन विभागाचे ग्रहण लागल्यामुळे गेली ७५ वर्ष पायपीट करुन जावे लागत आहे.पावसाळ्यात ही वाट अतिषय बिकट असल्यामुळे या रस्त्याला वन विभागाची हिरवा कंदिल मिळावा यासाठी गुरुवार २४ जुलै ला सकाळी खालापूर तहसील कार्यालय समोर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही आदिवासी वाड्यांतील ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार असल्यांचे समजते.
या वाडीमध्ये जाण्यांसाठी रस्ता मिळावा यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे माध्यमातून गेली ४ वर्षापासून वन विभागासह जिल्हा प्रशासनाकडे विनंती अर्ज, आंदोलने,मोर्चे यांसह उपोषण करण्यात आले.मात्र खालापूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.वन हक्क कायदा २००६ चे कलम ३ /२ नुसार या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या वन जमिनीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली नसल्याने येथिल ग्रामस्थांना या मार्गावरुन प्रवास करतांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यामुळे आजही खडई धनगरवाडा,करंबेळी ठाकूरवाडीतील ग्रामस्थ आजही मूलभूत सुविधापासून वंचित आहे.भारत स्वातंत्र होवून ही आजही सुख सुविधा पासून दुर असलेल्या या वाड्यांना रस्त्याला मंजूरी मिळावी यासाठी हे आमरण उपोषणांचे हत्यार ग्रामस्थ उपसणार असल्यांचे समजते.
0 Comments