लायन्स क्लब खालापूर अध्यक्ष पदि किशोर पाटील यांची निवड

लायन्स क्लब खालापूर अध्यक्ष पदि किशोर पाटील यांची निवड,

अनेकांनी दिल्या शुभेच्छा,पद भार स्विकारल्या नंतर अनेक उपक्रम हाती घेण्यांचा मानस 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २६ जुलै,


          लायन्स क्लब खालापूर चा इंस्टालेशनचा कार्यक्रम श्री क्षेत्र अष्टविनायक मंदिर महड येथे घेण्यांत आले.यावेळी नवीन कमिटीचा पदग्रहण सोहळा तसेच अध्यक्ष पदासाठी किशोर पाटील यांची निवड करण्यांत आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांस पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.गेले अनेक वर्ष उत्तमपणे काम करीत असतांना आपल्या बुद्धिमतेच्या विचारांतून अनेक उपक्रम यशस्वी पणे संपन्न केले असता.त्यांस हे अध्यक्ष पद सर्वांनुमते देण्यांत आले. 
            या कार्यक्रम ची सुरवात दिप प्रज्वल व स्वागत गीत व राष्ट्रगीत सादर करुन करण्यांत आली.या कार्यक्रमाची प्रास्तावना शिवानी जंगम यांनी केली. वर्षभर केलेले उपक्रम किशोर पाटील यांनी सादर केला.यावेळी नविन पाच सभासदाची नियुक्ती करुन शपथविधी घेण्यांत आला.
        या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुरुकुल महड येथिल विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरी पारायण प्रत  तसेच बॅग व वह्या वाटप करण्यात आल्या.मनुचक्षु संस्था महड या संस्थेस अन्न धान्य व किराणा माल  देण्यात आला.शिरवली खालापूर येथील मुलांना वह्या व बॅग वाटप करण्यात आले.व हेल्प फौंडेशन अपघात ग्रस्त संस्था करत असलेल्या कार्याबद्दल संस्थेस लायन्स क्लब खालापूर कडून सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.१० वी १२ पोस्ट ग्रॅज्युएट पदवी प्राप्त मुलांचा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.अदि कार्यक्रम घेण्यांत आले.
          सदर कार्यक्रम साठी इंस्टालेशन ऑफिसर संतोष चव्हाण  डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ट्रेजर - प्रमोद दालमिया   सेकंड वाईस डिस्ट्रिक्ट गव्हरनर - विजय गणांत्रा   एक्स्टेंशन चेअरपर्सन - ज्योती देशमाने,नागेश देशमाने, झोनल ऑफिसर -घोडके,धरम पाल,अध्यक्षा लायन्स क्लब खालापूर शिवानी ताई जंगम, मधुकर म्हसे,नगर पंचायत खालापूर नगराध्यक्षा - रोशनीताई मोडवे, सरपंच माजगाव - दिपाली पाटील,गुरुवर्य रामदास ( भाई ) महाराज पाटील, मा. नगरसेवक खोपोली - किशोरजी पानसरे,उप सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खालापूर - जयवंत पाटील 
        त्याच बरोबर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष खोपोली लायन्स क्लब - अविनाश राऊत   निजामुद्दीन शेख,विशाल बियाणी,कासार तसेच रसायनी लायन्स क्लब चे पदाधिकारी दत्तात्रय जांभळे,राज जाधव, हरीश पाटील,नवीन कमिटी लायन्स क्लब खालापूर च्या अध्यक्ष पदी किशोर नामदेव पाटील प्रथम उपाध्यक्ष   भरत पाटील,द्वितीय उपाध्यक्ष -  हरिभाऊ जाधव सचिव- लहू भोईर व ट्रेजरर -  जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती करण्यात आली.
            त्याच बरोबर विविध हा पद भार स्विकारल्या नंतर आरोग्य कॅम्प,करिअर मार्गदर्शन, रक्तदान शिबीर जेस्ट नागरिक साठी शरीर पूर्ण तपसाणी,   फिजीवोथेरपी, कॅन्सर रोग तपासणी,दुर्गम भागातील गोर गरीब आदिवासी विध्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य व दुर्गम भागातील शाळा दुरुस्ती कार्य हाती घेण्याचं मानस व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र सावंत यांनी केले.किशोर पाटील यांनी लायन्स क्लब चे नवनिर्वाचित अध्यक्ष होताच त्यांस उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

वास्तुशास्त्र नुसार निरोगी जीवनाचे रहस्य व उपाय