मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने, चौक येथे रक्तदान व मोफत आरोग्य शिबीर
माय मराठी न्युज :वृत्तसेवा
खालापूर : २७ जुलै,
दरवर्षी शिवसेना पक्ष प्रमुख व मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करत असले तरी कार्यकर्ते त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करतात.शिवसेना पक्षाच्या ध्येयधोरणानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या उद्देशाने या वर्षी चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल विचारे यांच्या संकल्पनेतून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर घेऊन चौक विभागाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
खालापूर तालुक्यातून मुंबई पुणे दृतगती महामार्ग,मुंबई पुणे जुना महामार्ग आणि अलिबाग पुणे महामार्ग असे तीन महत्वाचे महामार्ग जातात.या महामार्गांवर सतत वाहनांची गर्दी असते.अपघातही मोठ्या प्रमाणात होत असतात त्यामुळे रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत असते तसेच अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया होत असतात त्यासाठीही रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते या रक्ताचा पुरवठा व्हावा आणि आपल्या राज्याचे लाडके शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा व्हावा यादृष्टीकोनातून शिवसेना चौक जिल्हा परिषद विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली चौक ओम साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळपासूनच रक्तदान करण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.बदलापूर येथीलमाया ब्लड सेंटर रक्तपेढीच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अनेक रक्ताच्या बॅग संकलित करण्यात आल्या. तसेच यावेळी इ सी जी, शुगर टेस्ट, ब्लड प्रेशर, युरिन टेस्ट आदी आरोग्यावर तपासणी करण्यात आली संपूर्ण राज्यात आपले. ही तपासणी मोफत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेना पक्षाचे आभार मानले. यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, उपसभापती श्यामभाई साळवी, युवा सेना तालुका प्रमुख निखिल मालुसरे, विभाग प्रमुख तुळशीराम पाटील, गोरख रसाळ, सरपंच सुहास कदम, मनोहर देशमुख, सुहास देशपांडे, अजिंक्य चौधरी, अशोक चौधरी, शशिकांत मालुसरे, स्वप्नील सोनटक्के, रामदास काईनकर, प्रकाश जाधव, कुमार बोराडे, विष्णू खैर आदी आजी माजी शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.


0 Comments