पाताळगंगा नदीपूजन व आरती,सहज सेवा फाऊंडेशन द्वारा महिलांसाठी श्रावणी हळदी कुंकू कार्यक्रम
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २८ जुलै,
खोपोली हद्दीतून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी तसेच नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जन जागृती म्हणुन सहज सेवा फाउंडेशन द्वारा गगनगिरी मठ आश्रम,खोपोली येथे नदी पुजन व आरती साजरी तसेच सामूहिक श्रावणी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आगळेवेगळे आयोजन करण्यात आले.यावेळी महिला वर्गांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद दिल्यांचे पहावयांस मिळाले.
यावेळी विविध खेळांच्या माध्यमातून महिलांसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच पर्यावरणाचे भान ठेवून महिलांना वाण स्वरूपात प्रत्येकी सीड बॉल व कापडी पिशवी भेट देण्यात आली.खोपोली नगरपरिषद विभागातील महिलांचा वाढदिवस प्रत्येक महिन्यातील चौथ्या शनिवारी नदीपूजनाच्या वेळी सामूहिकपणे साजरा करण्यात येणार असून त्यावेळी एक लकी ड्रॉ सुद्धा काढण्यात येणार आहे.या उपक्रमासाठी आनंद शाळा, खोपोली,प. पु. गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली,आर. टी. झवेरी ज्वेलर्स खोपोली,सद्गुरू ग्राफिक्स, खोपोली यांचे विशेष सहकार्य मिळाले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी,महिला अध्यक्षा निलम पाटील,सचिव अखिलेश पाटील,खजिनदार संतोष गायकर,सह सचिव नम्रता परदेशी,जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार,सल्लागार नरेंद्र हर्डीकर,प्रकल्प प्रमुख सीमा त्रिपाठी,कल्याणी साखरे,वेदा साखरे,हितेश राठोड सोबत जीनी सॅम्युअल,संदीप दुबे,अंजली शर्मा, संगीता शुक्ला, सुनिता चव्हाण,दमयंती कोळी,मुस्कान सय्यद,निलम समेळ,रंजन चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.
0 Comments